लोणावळा नगरपरिषद इथे आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये प्रामुख्याने शहरातील विकास कामांबाबत चर्चा झाली. तसेच उपस्थित नागरिकांसोबत आमदार महोदयांनी संवाद साधून त्यांच्या तक्रारी व समस्या जाणून घेतल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोणावळा इथे होत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या ऑक्सिजन प्लांटसाठी आवश्यक जागा नगरपरिषदेकडून उपलब्ध करुन देण्यात येईल. प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे फेब्रुवारीमध्ये शिवजयंतीवेळी भुमिपूजन करण्याचा मानस असुन त्या अनुषंगाने स्मारकास मंजुरी घेऊन लवकरच त्यावर निधीची तरतूद केली जाईल, असे आमदार शेळकेंनी सांगितले. ( review meeting in presence of mla sunil shelke at lonavla nagar parishad )
या बैठकीला आमदार सुनिल शेळके, मुख्याधिकारी अशोक साबळे, पोलीस निरीक्षक सिताराम डुब्बल, MSRDC कार्यकारी अभियंता श्रीमती शैलजा पाटील, सा.बां. विभाग उप अभियंता धनराज दराडे, माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेवक राजु बच्चे, भरत हरपुडे, विलास बडेकर, सुभाष सोनवणे, दत्ता येवले, अमित गवळी, निखील कविश्वर, राजु बोराटी, नारायण पाळेकर, जीवन गायकवाड, माणिक मराठे, विशाल पाडाळे, आरोहीता तळेगावकर, उमा मेहता, रचना सिनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूतील श्री तुकाराम महाराज मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम । Dehu News
– मावळ राष्ट्रवादीतील शरद पवार गटाची वडगाव इथे विशेष बैठक; विधानसभा क्षेत्रातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर । Maval NCP
– आंघोळीला पाणी दिले नाही म्हणून पत्नीला बेदम मारहाण, पाहा कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार । Crime News