महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ आणि मावळ तालुका पोलीस पाटील संघ आयोजित पदग्रहण सोहळा नुकताच पाक पडला. महाराष्ट्र गाव कामगार संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी दारुंब्रे येथील पोलिस पाटील लक्ष्मण बबनराव शितोळे यांची, तर मावळ तालुकाध्यक्षपदी शांताराम वसंत सातकर यांची नुकतीच निवड झाली. या निवडीचे पत्र संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते नुकतेच प्राप्त झाले. त्यानंतर हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे आणि मावळ तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. शितोळे यांना मावळ तालुकाध्यक्षपदावरून थेट प्रदेश उपाध्यक्षपद मिळाल्याने मावळ तालुका पोलिस पाटील संघटनेत आनंदाचे वातावरण आहे. ( Maharashtra State Village Workers Police Patil Sangh News Maval Taluka )
‘माझ्या तालुकाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ज्या पद्धतीने कामे झाली आहेत, त्याचा परिपाक म्हणून मला राज्यात नेतृत्व करण्याची संधी वरिष्ठांनी दिली असावी. राज्य पातळीवरही मी सर्वांना सोबत घेऊन आणि समाज परिवर्तनाची कामे कशी होतील, याकडे माझा कटाक्ष असणार आहे.’ असे शितोळे म्हणाले.
अधिक वाचा –
– कार्ला जवळील वॅक्स म्युझियममध्ये मनोज जरांगे पाटील यांचा हुबेहुब पुतळा, जरांगे स्वतः पुतळा पाहायला येणार? । wax statue of manoj jarange patil
– महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी मदतीचा हात; मालेवाडी, महागाव येथे महिलांना पिठाची गिरण आणि मसाला बनवण्याच्या यंत्राचे वाटप
– मुंबईच्या दिशेने निघालेले मराठ्यांचे भगवे वादळ 24 तारखेला मावळ तालुक्यात येणार; वाकसई इथे 100 एकरात जंगी सभेची तयारी । Maratha Reservation