निवडणूक आयोगाद्वारे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येऊन मंगळवारी (दि. 23) मतदार यादी अंतिम (Final Voter List) करण्यात आली. ही यादी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रावर तसेच निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मतदारांनी या यादीत आपले नाव असल्याची खातरजमा करून घ्यावी. आपल्या तपशीलात काही बदल करायचा असल्यास विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. यादीच्या अद्ययावतीकरणाची प्रक्रिया निरंतर सुरु राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राज्याची एकूण स्थिती काय?
ऑक्टोबर 2023 प्रारुप मतदार यादीत 24 लाख 33 हजार 766 मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच 20 लाख 21 हजार 350 मतदारांची नावे वगळण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये 4 लाख 12 हजार 416 मतदारांची निव्वळ वाढ होऊन एकूण मतदारांची संख्या 9 कोटी 12 लाख 44 हजार 679 इतकी (9 Crore Voters In Maharashtra) झाली आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये 18 ते 19 या वयोगटामध्ये 6 लाख 70 हजार 302 मतदारांची नव्याने भर पडली आहे, तसेच 20 ते 29 या वयोगटात 8 लाख 33 हजार 496 मतदारांची वाढ झालेली आहे. ( Final Voter List In Maharashtra)
पुणे जिल्ह्याची स्थिती काय?
पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंगळवारी (दि 23) जिल्ह्यातील मतदारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. या यादीत विधानसभानिहाय एकूण मतदारांची संख्या देण्यात आली आहे. या यादीतील मतदारांच्या आकडेवारीवरून चिंचवड हा जिल्ह्यात सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 21 पैकी 14 विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून, उर्वरित सात विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. (Chinchwad Is Largest Constituency In Pune)
मतदारांची संख्या वाढलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये हडपसर, खडकवासला, कोथरूड, वडगाव शेरी, भोसरी, पिंपरी, चिंचवड, मावळ, भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, खेड आणि शिरूर आदींचा तर, मतदार संख्या कमी झालेल्या मतदारसंघांमध्ये जुन्नर, आंबेगाव, दौंड, कसबा, कँटोन्मेंट, पर्वती आणि शिवाजीनगर या सात मतदारसंघांचा समावेश आहे. (Increase In Voters In Maval Constituency)
विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची आकडेवारी –
- जुन्नर – 3 लाख 8 हजार 439
- आंबेगाव – 2 लाख 98 हजार 598
- राजगुरुनगर (खेड) – 3 लाख 45 हजार 35
- शिरूर – 4 लाख 29 हजार 818
- दौंड – 2 लाख 99 हजार 260
- इंदापूर – 3 लाख 18 हजार 924
- बारामती – 3 लाख 64 हजार 40
- पुरंदर – 4 लाख 14 हजार 690
- भोर – 3 लाख 97 हजार 845
- मावळ – 3 लाख 67 हजार 779
- चिंचवड – 5 लाख 95 हजार 408
- पिंपरी – 3 लाख 64 हजार 806
- भोसरी – 5 लाख 35 हजार 666
- वडगाव शेरी – 4 लाख 52 हजार 628
- शिवाजीनगर – 2 लाख 72 हजार 798
- कोथरूड – 4 लाख 1 हजार 419
- खडकवासला – 5 लाख 21 हजार 209
- पर्वती – 3 लाख 34 हजार 136
- हडपसर – 5 लाख 62 हजार 186
- पुणे कॅंटोन्मेंट – 2 लाख 69 हजार 588
- कसबा पेठ – 2 लाख 72 हजार 747
अधिक वाचा –
– विविध सरकारी योजनांबाबत महिलांमध्ये जनजागृती; हॅन्ड इन हॅन्ड इंडिया आणि बेलस्टार यांचा संयुक्त उपक्रम । Alandi News
– मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी मावळ तालुका सज्ज, आमदार सुनिल शेळके यांचे मावळवासियांना आवाहन, वाचा… । Manoj Jarange Patil & MLA Sunil Shelke
– कार्ला जवळील वॅक्स म्युझियममध्ये मनोज जरांगे पाटील यांचा हुबेहुब पुतळा, जरांगे स्वतः पुतळा पाहायला येणार? । wax statue of manoj jarange patil