मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला निघालेले लाखो मराठा आंदोलक आणि त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील हे आज, गुरुवारी (दि. 25) लोणावळ्याहून पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आज मराठ्यांच्या भगव्या वादळाचा वाशी येथे मुक्काम असणार आहे. तत्पुर्वी गुरुवारी दुपारी पाऊणेबाराच्या सुमारास जरांगे पाटील यांची लोणावळ्यात जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी आंदोलनाची पुढची दिशा सांगितली. दरम्यान भाषणात त्यांनी मावळ तालुक्यातील मराठा बांधवांचे कौतूक केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मनोज जरांगे पाटील हे आज सकाळी काही काळ विश्रांतीसाठी वाकसई येथे थांबले होते. जाहीर सभेपूर्वी त्यांनी काहीवेळ आराम केला आणि नंतर ते सभास्थळी दाखल झाले. या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचा खास मावळा पगडी देऊन सन्मान करण्यात आला. मावळ तालुक्यातील मराठा बांधवांचे प्रेम पाहून, आणि मावळ तालुक्यात मानाच्या मावळा पगडीने झालेला सन्मान पाहून जरांगे पाटील भावूक झाले. ( Manoj Jarange Patil was honored with Mavala Pagadi in Maval taluka )
महाराष्ट्र शासन मराठी चित्रपट अनुदान समितीचे सदस्य भुषण जगताप यांच्या वतीने आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने जरांगे पाटील यांना मावळा पगडी देऊन सन्मान करण्यात आला. मराठा समाजाचे खरेखुरे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे या मावळी पगडी चे खरे मानकरी असल्याने त्यांना ही पगडी दिल्याचे भुषण जगताप यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– मनोज जरांगे पाटील मावळ भूमीत दाखल, पहाटे उशीरा वाकसई मुक्कामस्थळी जरांगेंचे आगमन, 9 वाजता होणार जाहीर सभा । Maratha Reservation Manoj Jarange Patil
– व्हॉट्सअॅपद्वारे खोटी माहिती पसरवणे ते चौकात बॅनर लावणे, कलम 144 मुळे लोहगड भागात कशावर प्रतिबंध? जाणून घ्या । Lohgad Fort News
– लोहगड किल्ल्यावरील हजी हजरत उमरशावली बाबा दर्गा उरूसाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी । Lohgad Fort News