मराठा आरक्षणासाठी जालनातील अंतरवाली सराटी येथून निघालेले मराठ्यांचे भगवे वादळ आज (गुरुवार, दि. 25 जानेवारी) मावळ तालुक्यातून पुढे सरकून घाटाखाली उतरले. तत्पुर्वी आज, गुरुवारी लोणावळा जवळील वाकसई येथे मनोज जरांगे पाटलांची भव्य सभा झाली. ही सभा पुर्वनियोजित असल्याने लाखो मराठा बांधव या सभेसाठी जमले होते. काहीजण आंदोलनाची पुढची दिशा समजून घेण्यासाठी आले होते, काहीजण लाखोंच्या संख्येने जमलेल्या मराठा बांधवांना पाहायला आले होते, काही जण मनोज जरांगे पाटील यांना ऐकायला आले होते, तर काहीजण फक्त मनोज जरांगे पाटील यांना पाहायला आणि शक्य झाल्यास एखादा फोटो त्यांच्यासोबत काढायला आले होते.
परंतू मनोज जरांगे पाटील यांच्या भोवतालचा सहकाऱ्यांचा गराडा आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे जरांगे पाटलांना भेटणे सर्वांना अशक्य होते, आणि फोटो काढणे तर दूरची बात. पण आंदोलकांची, मराठा बांधवांची ही अपेक्षा रियल मनोज जरांगे पाटील पूर्ण करू शकले नसले तरीही त्यांचे प्रतिरूप असलेल्या मैदानावरील रिल लाईफ मनोज जरांगे पाटील यांनी केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वाकसईच्या मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या सारखीच दिसणारी एक व्यक्ती वावरत होती आणि त्यांच्या अचूक जरांगे पाटील दिसण्याने अनेकजण त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी चढाओढ करत होते. फोटो-सेल्फीसाठी झुंबड उडाली होती. प्रति जरांगे-पाटील देखील कुणालाही न डावलता फोटोसेशन करत होते. यानिमित्ताने मनोज जरांगे पाटील यांच्यावर मराठा बांधव किती प्रेम करतात, हे जवळून अनुभवत होते. ( Lonavala Vaksai Maratha Reservation Rally Duplicate Manoj Jarange Patil Photo )
View this post on Instagram
अधिक वाचा –
– मावळमधील पिंपरी बुद्रुक गावात महिलांसाठी समाज केंद्राची उभारणी; बचत गटातील महिलांसाठी प्रथमच ‘लोणचे उद्योगास’ सुरुवात
– मनोज जरांगे पाटील मावळ भूमीत दाखल, पहाटे उशीरा वाकसई मुक्कामस्थळी जरांगेंचे आगमन, 9 वाजता होणार जाहीर सभा । Maratha Reservation Manoj Jarange Patil
– व्हॉट्सअॅपद्वारे खोटी माहिती पसरवणे ते चौकात बॅनर लावणे, कलम 144 मुळे लोहगड भागात कशावर प्रतिबंध? जाणून घ्या । Lohgad Fort News