पावलो-पावली हजारोंच्या संख्येने जमलेला मराठा समाज, वित-वित जागा पुढे जाण्यासाठी मिनिटांचा कालावधी, चौकाचौकात क्रेनला लटकवलेले हार आणि फाटक्यांची आतिषबाजी.. यामुळे बुधवारी सकाळी वाघोलीतून निघालेले मराठ्यांचे भगवे वादळ पुन्यनगरी आणि कामगार नगरी पार करून मावळ भूमीत दाखल होण्यासाठी अखेर दुसरा दिवस उलटला. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई पायी वारीचे पाचव्या दिवशी निश्चित केलेले मुक्कामाचे ठिकाण वाकसई मैदान, लोणावळा गाठण्यासाठी सहावा दिवस म्हणजे आज, गुरुवार (दि. 25 जानेवारी) रोजीची पहाट उजाडली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अश्वारूढ छत्रपती शिवरायांचा पुतळा असलेली गाडी ही मनोज जरांगे यांच्यासह लाखो मराठा बांधवांच्या मुंबई पायी वारीची निशाणी. आज सकाळी 6.45 वाजता मनोज जरांगे पाटील यांसह त्यांचे लाखो मराठा बांधव वाकसई येथे सभास्थळी दाखल झाले आणि त्यांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आतूर झालेले व रात्रभऱ प्रतिक्षा केलेले मराठा बांधव यांनी एकच जल्लोष केला. आता 2 तासांच्या विश्रांतीनंतर 9 वाजता मनोज जरांगे यांची जाहीर सभा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ( Manoj Jarange Patil arrives at Lonavala Vaksai Ground Public Rally at 9 am Maval Taluka )
अधिक वाचा –
– मावळमध्ये विकास कामांचा धडाका! खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते 21.50 कोटींच्या कामांचे भूमिपूजन । Maval News
– मावळ तालुक्यात कुठल्या शहरात आणि किती वाजता येणार मराठा समाजाचे भगवे वादळ? पाहा मनोज जरांगे यांचे आजचे वेळापत्रक । Maratha Reservation Manoj Jarange Patil
– मुंबई-पुणे प्रवासासाठी घराबाहेर पडणार असाल तर आधी ही बातमी वाचा, नाहीतर अडकाल… । Mumbai Pune Expressway News