व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

किवळे, देहू बाजारपेठ भागात एफडीएचे छापे, तब्बल 35 लाखांचे प्रतिबंधित पदार्थ जप्त; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन, वाचा… । Crime News

पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 25, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात दोन ठिकाणी छापे टाकून 35 लाख 16 हजार 921 रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी आदींचा साठा जप्त करण्यात आला. पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

देहू रोड परिसरातील दांगट पाटील यांचे गोदाम, विकासनगर किवळे या ठिकाणी प्रतिबंधित पदार्थाची साठवणूक व विक्री करण्यात येत असल्याच्या माहितीवरुन मंगळवारी (दि. 23) टाकलेल्या छाप्यानुसार 23 लाख 68 हजार 580 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच रियाझ अजीज शेख, घर क्र. 125, देहू मुख्य बाजार, देहू कॅन्टोन्मेंट, देहू बाजार येथे आज टाकलेल्या छाप्यात 11 लाख 48 हजार 341 रुपये किंमतीचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या दोन्ही प्रकरणात देहूरोड पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) एन. आर. सरकटे, अन्न सुरक्षा अधिकारी शीतल घाटोळ, सायली टाव्हरे, अस्मिता गायकवाड, राहूल खंडागळे, बालाजी शिंदे आणि प्रकाश कचवे यांनी केली. नागरिकांचे जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून 18 जुलै 2023 च्या आदेशानुसार राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाकु, सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखु जन्य पदार्थावर उत्पादक, साठा, वितरण व विक्री यावर 1 वर्षाकरिता बंदी घातलेली आहे.

प्रतिबंधीत गुटखा, पान मसाला इत्यादीच्या विक्रीबाबतची माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधण्याचे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) अ. गो. भुजबळ यांनी केले आहे. ( Food and Drug Administration FDA raids in Kiwale Dehu area seized banned substances worth 35 lakhs )
अधिक वाचा –
– व्हॉट्सअ‍ॅपद्वारे खोटी माहिती पसरवणे ते चौकात बॅनर लावणे, कलम 144 मुळे लोहगड भागात कशावर प्रतिबंध? जाणून घ्या । Lohgad Fort News
– लोहगड किल्ल्यावरील हजी हजरत उमरशावली बाबा दर्गा उरूसाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी । Lohgad Fort News
– मावळमध्ये विकास कामांचा धडाका! खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते 21.50 कोटींच्या कामांचे भूमिपूजन । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

मावळमधील पिंपरी बुद्रुक गावात महिलांसाठी समाज केंद्राची उभारणी; बचत गटातील महिलांसाठी प्रथमच ‘लोणचे उद्योगास’ सुरुवात

Next Post

मावळ तालुक्यात मनोज जरांगे पाटलांचा खास मावळा पगडी देऊन सन्मान; पगडी डोक्यावर चढवताच पाटील भावूक । Manoj Jarange Patil In Lonavala

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
manoj-jarange-Mavala-Pagadi

मावळ तालुक्यात मनोज जरांगे पाटलांचा खास मावळा पगडी देऊन सन्मान; पगडी डोक्यावर चढवताच पाटील भावूक । Manoj Jarange Patil In Lonavala

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.