वडगाव मावळ (Vadgaon Maval) : स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा समिती मार्फत यंदाचा सामुदायिक विवाह सोहळा हा मे महिन्यातील पहिल्या तारखेला होणार आहे. सायंकाळी 5 वाजुन 30 मिनिटांनी हा विवाह सोहळा संपन्न होईल, अशी माहिती प्रतिष्ठानने दिली आहे. यामध्ये सर्व जाती धर्मातील जोडप्यांचा समावेश असणार आहे. तसेच जोडप्यांना संसारासाठी लागणारी प्राथमिक भांडी, लग्नाचा पोशाख, साड्या, वऱ्हाडी मंडळींसाठी भोजन, नवरदेवाची मिरवणूक आदींची व्यवस्था समिती मार्फत करण्यात येणार आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
दिनांक 10 एप्रिल पर्यंत जोडप्यांची नोंदणी करण्याची अंतिम मुदत असून नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपन्न होत असलेला हा उपक्रम गेली 10 वर्षांपासून राबविण्यात येत आहे. आजवर सुमारे 165 जोडपी प्रतिष्ठानच्या सार्वजनिक विवाहसोहळ्यातून विवाहबद्ध झाली आहेत. यंदाही 1 मे रोजी तीर्थ श्रेत्र श्री पोटोबा महाराज प्रांगणात हा विवाहसोहळा होणार आहे. (Community marriage ceremony on May 1 in Vadgaon Maval through Keshavrao Dhore Pratishtan)
अधिक वाचा –
– वारकरी शिक्षण संस्थेसाठी 5 कोटींचा निधी देणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; आळंदी येथे बंकटस्वामी सदनाचे लोकार्पण
– धक्कादायक! मृत झालेल्या बिबट्याच्या पायाचा पंजा आणि नखे कापून नेली, अवयव चोरीप्रकरणी वन विभागाच्यावतीने गुन्हा दाखल । Pune News
– गाव चलो अभियान अंतर्गत तुंगार्ली येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचा दौरा, ‘विकसित भारत घडवण्यासाठी पुन्हा मोदीजींना पंतप्रधान करा’ – विक्रांत पाटील