पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर आज (रविवार, दि. 18) पुन्हा एकदा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mega Block on Pune Lonavala Railway Route) मध्य रेल्वे, पुणे विभागातर्फे पुणे-लोणावळा मार्गावर अत्यावश्यक अभियांत्रिकी व देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. मागील अनेक रविवार प्रमाणे आजही पुणे-लोणावळा उपनगरीय सेवा तात्पुरती बंद राहणार आहे. रेल्वे विभागाने प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
खालील लोकल गाड्यांच्या फेऱ्या रद्द –
01562 पुणे-लोणावळा लोकल पुण्याहून 9.57 रद्द
01564 पुणे-लोणावळा लोकल पुण्याहून 11.17 वाजता रद्द
01592 शिवाजी नगर- लोणावळा लोकल शिवाजीनगर येथून सुटणारी दुपारी 12.05 वाजताची लोकल रद्द
01566 पुणे-लोणावळा लोकल पुण्याहून 15.00 वाजताची लोकल रद्द
01588 शिवाजी नगर- तळेगाव लोकल शिवाजीनगर येथून 15.47 वाजताची लोकल रद्द
01568 पुणे-लोणावळा लोकल पुण्याहून 16.25 वाजताची लोकल रद्द
01570 शिवाजी नगर- लोणावळा लोकल पुण्याहून 17.20 वाजताची लोकल रद्द
01559 लोणावळा- शिवाजीनगर लोकल लोणावळ्याहून सकाळी 10.05 वाजताची लोकल रद्द
01591 लोणावळा- शिवाजीनगर लोकल लोणावळ्याहून सकाळी 11.30 वाजताची लोकल रद्द
01561 लोणावळा-पुणे लोकल लोणावळ्याहून 14.50 वाजताची लोकल रद्द
01589 तळेगाव-पुणे-लोकल तळेगावहून 16.40 वाजताची लोकल रद्द
01565 लोणावळा- शिवाजीनगर लोकल लोणावळ्याहून 17.03 वाजताची लोकल रद्द
01567 लोणावळा- शिवाजीनगर लोकल लोणावळ्याहून 18.08 वाजताची लोकल रद्द
01569 लोणावळा-पुणे लोकल लोणावळ्याहून 19.00 वाजताची लोकल रद्द
यासह एमजीआर चेन्नई-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 12164 3.30 तास नियमित राहील. रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे मेंटेनन्स मेगाब्लॉक महत्त्वाचे आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणतीही गैरसोय झाल्यास प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. ( Mega Block on Pune Lonavala Railway Route 14 Local Train Cancelled Check Time Table )
अधिक वाचा –
– संत सेवालाल महाराज यांची 285 वी जयंती उत्साहात साजरी, तळेगाव दाभाडे शहरात भव्य मिरवणूक । Talegaon Dabhade
– मावळ तालुक्यातील पिंपरी गावात मध केंद्र योजनेचा जनजागृती मेळावा संपन्न; खादी व ग्रामोद्योग मंडळाचा उपक्रम । Maval News
– श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनकडून कर्तृत्ववान व्यक्ती, संस्थांचा गौरव; ‘रामकृष्ण मोरे यांच्या स्मृती आप्पा बारणे यांनी ताज्या ठेवल्या’