मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातील महायुती सरकारने आज, मंगळवारी (दि. 20) एक ऐतिहासिक घोषणा केली. आजच्या राज्य विधीमंडळाच्या एकदिवसीय विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक सादर करण्यात आले होते. हे विधेयक दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले. याशिवाय मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने याद्वारे घेतला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
मराठा समाजास शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण मंजूर –
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणासाठी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने संमत केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. (Maratha Reservation Bill For 10% Quota Cleared By Maharashtra Assembly CM Eknath Shinde Govt)
इतर मागास वर्ग (ओबीसी) अथवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतल्यानंतर शासनाने तीन महिन्यात आरक्षणाचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
राज्यातील शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देणारे विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात बहुमताने संमत करण्यात आले. यावेळी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर येऊन माझ्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि आमदार यांनी एकत्र येऊन आनंद व्यक्त केला.… pic.twitter.com/zMT2JK4nvh
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 20, 2024
अधिक वाचा –
– समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेत श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेच्या विद्यार्थ्यांचा डंका, दमदार कामगिरीसह टॉप फाईव्हमध्ये स्थान
– आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून उर्से आणि परंदवडी गावातील ठाकर समाजातील 90 नागरिकांना मिळाले जात प्रमाणपत्र
– आरोग्य विभागातील 10 हजार 949 रिक्त पदांची भरती प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू – आरोग्य मंत्री तानाजी सावंत