एम.एच. करियर अॅकडमी कार्ला यांच्या वतीने शिवजयंती दिनाचे (दि. 19) औचित्य साधून नुकत्याच झालेल्या विविध स्पर्धा परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. रेल्वेभरती, लेखपाल, पोलिस भरती, पायलट आशा विविध स्पर्धांत यशस्वी झालेल्या गुणवंताचा सन्मान करण्यात आला. यासह शिवजयंतीदिनी प्रसिद्ध शिव व्याख्याते सतीश साठे यांचे शिव व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
शिवजयंती निमित्त एम.एच. अॕकडमी संस्थेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी किल्ले कोराईगड येथून शिवज्योत आणली. त्यानंतर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांंच्या प्रतिमेचे पूजन करत कार्यक्रमाला सुरूवात झाली. स्पर्धा परीक्षेतील सत्कार मूर्ती गुणवंत विद्यार्थी विशाल हरिहर (वन परिक्षेत्र अधिकारी (राजपत्रित), सुशील नाईकनवरे (रेल्वे पोलीस), आवंती मोहिते (पोलीस शिपाई), प्रतीक त्रिंबके (पोलीस शिपाई), हेमंत भालेकर (लोको पायलट), सचिन लोखंडे (वरिष्ठ सहाय्यक लेखापाल) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. (meritorious students in competitive examination were felicitated at karla on occasion of shiv jayanti 2024)
यावेळी माजी सभापती शरद हुलावळे, सरपंच कार्ला दिपाली हुलावळे, ग्राम सदस्य सचिन हुलावळे, सदस्या वर्षा हुलावळे, सोनाली मोरे, आदर्श शिक्षक संतोष हुलावळे, उमेश इंगुळकर यांंच्यासह कार्ला ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थापक मितेश हुलावळे, सुत्रसंचालन श्रुती भगत, भक्ती हुलावळे तर आभार विजय जंगम यांनी मानले.
अधिक वाचा –
– कात्रजमधून अपहरण केलेल्या तरुणाची लोणावळ्यातून सुटका, खंडणीसाठी केले होते अपहरण । Pune News
– समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेत श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेच्या विद्यार्थ्यांचा डंका, दमदार कामगिरीसह टॉप फाईव्हमध्ये स्थान
– आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून उर्से आणि परंदवडी गावातील ठाकर समाजातील 90 नागरिकांना मिळाले जात प्रमाणपत्र