आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून कशाळ येथील गव्हाणे वस्ती रस्त्यावरील कामत ओढ्यावरील साकव पुलासाठी 42 लाखांचा निधी मंजूर झाला होता. मा. सरपंच विठ्ठलराव जाधव, मा. सरपंच शरदराव जाधव, मा. सरपंच तुकाराम जाधव यांनी आणि श्री मळूबाई प्रतिष्ठान यांच्याकडून यासाठी सतत पाठपुरावा करण्यात आला होता. रविवारी (दि. 25) या विकासकामाचे भूमिपूजन स्थानिकांच्या हस्ते पार पडले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
ओढ्यावर साकव नसल्याने मागील अनेक वर्षांपासून कामत वस्तीवरील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मोठी अडचण होत होती, परंतू आता हा प्रश्न मार्गी लागला आहे. साकव पुलासाठी समाजातील दानशूर व्यक्तिमत्व गुलाब जाधव, ज्ञानेश्वर जाधव यांच्या माध्यमातून जागा उपलब्ध झाली, त्यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. तसेच, आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून कशाळ/किवळे गावातील प्रत्येक वाडी वस्तीवर जाण्यासाठी रस्त्यांची सोय आणि सोनवणे वस्तीवरील समाज मंदिर बांधण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे विठ्ठल जाधव यांनी सांगितले. (Bhoomi Pujan of Sakav Bridge at Kashal Village Fund By Mla Sunil Shelke)
यावेळी नारायणराव ठाकर, नारायण मालपोटे, दिगंबर आगिवले, भिकाजी भागवत, शिवाजी करवंदे, धोंडू जाधव, ज्ञानेश्वर जाधव, सोपान जाधव, नवनाथ जाधव, रघुनाथ जगताप, बिजाबाई जाधव, विश्वनाथ जाधव, बाळासाहेब जाधव, नारायण जाधव, सुभाष जाधव, सोमनाथ जगताप, सुभाष शंकर, कैलास जाधव, नरेश जाधव, गुलाब जाधव, अनिल जाधव, राहुल जाधव, दिलीप जाधव, मंगेश मारुती जाधव, नितीन जाधव, निवृत्ती जाधव, रामदास जाधव, नरेश जाधव, गणेश जाधव, कैलास थरकूडे, संपत जाधव, सोमनाथ जाधव आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे; मंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा
– महत्वाचे! देहू नगरपंचायतीसाठी 24 कोटी 26 लाखाचा निधी, आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन । MLA Sunil Shelke
– औंध येथील जिल्हा रुग्णालयात पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवीन आयुष रुग्णालयाचे लोकार्पण आणि अतिदक्षता रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन