व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगर पंचायतीचा विकास आराखडा जाहीर, शहराच्या 20 वर्षांच्या विकासाचे नियोजन । Vadgaon Maval

गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला वडगाव शहराचा प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 28, 2024
in लोकल, मावळकट्टा, शहर
vadgaon-maval-dpr-plan

Photo Courtesy : Team Dainik Maval


गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला वडगाव शहराचा प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यात विविध 77 आरक्षणे, नवीन प्रशस्त रस्ते, आयटी हब, भाजी मार्केट, नाट्यगृह आदी सोयीसुविधांचा समावेश आहे. नगर पंचायतीच्या स्थापनेनंतर प्रथमच शहराचा विकास आराखडा तयार झाल्याने नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. त्यामुळे तो पाहण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, या विकास आराखड्याबाबत नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास एक महिन्याच्या आत त्या दाखल कराव्यात, असे आवाहन नगर पंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रवीण निकम यांनी केले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

मावळ तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या वडगाव शहराचा कारभार पूर्वी ग्रामपंचायत पाहत होती. फेब्रुवारी 2018 मध्ये शासनाने ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर केले. 15 जुलै रोजी नगर पंचायतीची पहिली निवडणूक झाली होती. वडगाव शहराचा विकास आराखडा करण्यासंबंधीचा ठराव 29 जानेवारी 2021 रोजी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी मिळून केला होता. त्यानंतर मोनार्च एजन्सीने अस्तित्वातील जमीन वापर नकाशा (इएलयू) तयार केला होता, तर सहायक संचालक नगररचना विभागाच्या नगररचना अधिकाऱ्यांनी शहरातील विकास आराखड्याचा दुसरा टप्पा म्हणजे प्रस्तावित जमीन वापर नकाशा तयार केला. सोमवारी तो नागरिकांच्या अवलोकनासाठी तसेच त्यावर सूचना व हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला. ( Development plan of Vadgaon Nagar Panchayat announced Maval Taluka )

वीस वर्षांच्या विकासाचे नियोजन –
शहराचे क्षेत्रफळ सुमारे 13 स्क्वेअर किलोमीटर एवढे असून त्यानुसार विकास आराखडा करताना आगामी वीस वर्षांच्या विकासाच्या दृष्टीने व सुनियोजित शहर करण्यासंदर्भात सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. मुख्य रस्ता (कोर्ट ते शिवाजी चौक) पंधरा मीटर तर गणपती मंदिरापासून ढोरेवाड्यात जाणारा रस्ता नऊ मीटरचा ठेवण्यात आला आहे. वडगाव ते सांगवी हा रस्ता 18 मीटर, वडगाव कातवी रस्ता 24 मीटर, खंडोबा मंदिर ते तळेगाव साखळी रस्ता 18 मीटर ठेवण्यात आला आहे.

शहरातील सर्व भागांना जोडतील अशा नऊ ते अठरा मीटर रुंदीच्या नवीन रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. रेल्वे स्टेशन ते विश्रामगृहाच्या बाजूने थेट हायवे, दत्त मंदिर ते हायवे, नगरपंचायत ते हायवे, शिवाजी चौक ते हायवे हे गावठाणातून हायवेला जोडणारे चार नवीन रस्ते, ब्राम्हणवाडी ते उर्से खिंड असा डोंगर पायथ्या लगत 36 मीटरचा बायपास रोड, रिंगरोड, रेल्वे स्टेशनला समांतर दोन्ही बाजूला प्रत्येकी बारा मीटरचा सेवा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. गावठाणात पाच तर गावठाण हद्दीबाहेर 72 आरक्षणे टाकण्यात आली आहेत.

नागरिकांना परवडणारी घरे बांधण्यासाठी चार आरक्षणे ठेवण्यात आली आहेत. कोर्ट, आठवडे बाजार व नगरपंचायत इमारत विस्तार, चावडी चौकात लायब्ररी तर शिवाजी चौकात प्ले ग्राउंड, चार ठिकाणे भाजी मंडई व आठवडे बाजारासाठी, 14 ठिकाणी प्ले ग्राउंड व गार्डन, चार ठिकाणी स्मशान भूमी व दफनभूमी, दोन जलशुद्धीकरण केंद्रे, दोन सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे, दोन दवाखाने, दोन शैक्षणिक केंद्रे, क्रीडांगण, नाट्यगृह व संग्रहालय, चार मनोरंजन केंद्र, रिंगरोडलगत ट्रक टर्मिनल, कातवीगावच्या हद्दीत सुमारे 25 एकर क्षेत्रावर आय. टी. हब, पाच एकरवर इलेक्ट्रिक सब स्टेशन, दोन चार्जिंग स्टेशन, सांस्कृतिक हॉल, नाना नानी पार्क, पार्किंग, खुल्या जागा आदी सुमारे 70 ते 75 सुविधांचा त्यात समावेश आहे.

Novel NIBR Ads

आरोग्याच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी एसटीपी प्लॅन्ट व शहरातील सर्व नाले संवर्धन व सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने नाल्यांसाठी ग्रीन बेल्ट आदी सर्व प्रकारच्या आरक्षणाचा त्यात समावेश आहे. आरक्षणात कोणाच्या मोकळ्या जागा अथवा घरे जात असल्यास त्यांना शासन नियमानुसार मोबदला किंवा टीडीआर दिला जाईल, अशी माहिती डॉ. निकम यांनी दिली. दरम्यान, हा प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या अवलोकनासाठी नगरपंचायत कार्यालयात लावण्यात आला असून, नागरिकांनी काही हरकती व सूचना असल्यास त्या एक महिन्याच्या आत लेखी स्वरूपात नगरपंचायत कार्यालय अथवा सहाय्यक संचालक नगररचना कार्यालयात दाखल कराव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. निकम यांनी केले आहे.

शहराच्या नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीकोनाने विकास आराखडा हा शहराचा आत्मा आहे. त्यामुळे जमिनीचा वापर अत्यंत नियोजन पद्धतीने होतो. नागरिकांना गुणात्मक व संख्यात्मकदृष्ट्या सर्वोत्कृष्ट सेवा उपलब्ध होतात. विकास आराखड्यामुळे आगामी काळात वडगाव शहरात गुंतवणूक व व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढेल व शहराचा कायापालट होईल. – डॉ. प्रवीण निकम, मुख्याधिकारी तथा प्रशासक, वडगाव नगरपंचायत

अधिक वाचा –
– मोठी बातमी! पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती, राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय
– महत्वाची माहिती! मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांनी नक्की वाचा, द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्यमार्गात मोठा बदल
– माय मराठीचा जागर! कान्हे शाळेत मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहात साजरा । Marathi Bhasha Gaurav Din 2024


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील ‘या’ गावांमध्ये साकव पुलांसाठी एकूण 2 कोटी 60 लाखांचा निधी, पाहा संपूर्ण यादी । Maval News

Next Post

कल्हाट येथे समाज मंदिराचे भूमिपूजन, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध । MLA Sunil Shelke

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
kalhat-village-maval

कल्हाट येथे समाज मंदिराचे भूमिपूजन, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध । MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.