व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमाबद्दल मावळमधील कान्हे शाळेच्या 400 विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शुभेच्छापत्र

मुख्यमंत्री 'माझी शाळा, सुंदर शाळा' या उपक्रमामुळे शालेय गुणवत्ता आणि भौतिक विकासाला चालना दिल्याबद्दल कान्हे शाळेतील विद्यार्थ्यांकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुमारे 400 'शुभेच्छा पत्रे' पाठवून मुखमंत्र्यांचे अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 2, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Mazi-Shala-Sundar-Shala

Photo Courtesy : Team Dainik Maval


महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी शाळांच्या भौतिक आणि गुणवत्ता विकासाला गती देऊन राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या शाळांना प्रसिद्धी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमात मावळ तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून तीन लाखाचे बक्षीसास पात्र ठरलेल्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक केंद्र शाळा कान्हे येथील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मुख्यमंत्री महोदयांना सुमारे चारशे शुभेच्छा पत्रे पाठवून अभिनंदन केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील सर्व शाळांना आपली गुणवत्ता आणि भौतिक सुविधा यात विलक्षण सुधारणा होण्यासाठी बक्षीस रूपाने मदतीचा हात देत ग्रामीण भागातील शाळा सुंदर करण्यात ऐतिहासिक निर्णय घेत हा उपक्रम सुरु केला. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असणारी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक केंद्रशाळा कान्हे, या शाळेने सहभागी होऊन मावळ तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी या निधीचा उपयोग होऊन या शाळेतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यात निश्चित फायदा होणार आहे. ( Mazi Shala Sundar Shala Students letter to CM ZP School Kanhe Village Maval Taluka )

कान्हे गावची आदर्श ग्रामपंचायत आणि प्रभावी काम करणारी शाळा व्यवस्थापन समिती यांनी झपाटून काम करून, स्वनिधी बरोबरच परिसरातील कंपन्याकडून सीएसआर मिळवत, दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, NGO, पालक यांच्याकडून रोख निधी आणि वास्तुरूपाने मदत घेवून भरीव विकासकामे केलेली आहेत. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या सुमारे 400 विद्यार्थ्याकडून मुख्यमंत्री महोदयांना या सुंदर उपक्रमाबद्दल शुभेच्छा पोस्ट कार्डवर लिहून सामूहिक शुभेच्छा पत्रे “कान्हे पोस्ट ऑफिस चे पोस्ट मास्टर ” मा.संतोष काकडे यांजकडे सुपूर्द केली.

ह्या स्तुत्य उपक्रमाचे नियोजन, शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला ढोरे यांनी करून सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी उत्तम सहकार्य केले. याकामी विशेष परिश्रम सुनिता देशमुख आणि दादासाहेब खरात यांनी घेतले. मावळ पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले, केंद्र प्रमुख अजित नवले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच कान्हे गावचे सरपंच विजय सातकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर सातकर व सर्व पदाधिकारी यांनीही सर्वांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा –
– वडगाव शहरातील जामा मस्जिद मधील विविध विकासकामांना सुरुवात; आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध
– दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी आमदार शेळकेंकडून मोफत वाहतूक सेवा, सलग 7 वर्षांपासून सुरु आहे उपक्रम
– IPS सत्यसाई कार्तिक यांची आणखी एक दमदार कामगिरी; पाच वर्ष जुन्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीच्या मुसक्या आवळल्या


dainik maval jahirat

Previous Post

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी 8 हजार मेगावॅट वीजनिर्मिती निश्चित, देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

Next Post

शिवे गावात महिलांना आर्थिक उन्नतीसाठी तीन दिवसीय मसाला बनवणे प्रशिक्षण शिबिर । Khed News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
spice-making-training

शिवे गावात महिलांना आर्थिक उन्नतीसाठी तीन दिवसीय मसाला बनवणे प्रशिक्षण शिबिर । Khed News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.