व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

बाळासाहेब घोटकुले हे मावळ तालुक्यातील सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय राहिले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 1, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात सामाजिक कार्यात सक्रीय असलेले बाळासाहेब लक्ष्मण घोटकुले यांच्या समाजकार्याची दखल घेत त्यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

हॉकी लिजेंड, पद्मभूषण मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार समिती आणि कालीरामण फाउंडशन इंडिया यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी बाळासाहेब घोटकुले यांची ‘सामाजिक (समाजरत्न)’ या प्रवर्गातून निवड झाली आहे.

बाळासाहेब घोटकुले हे मावळ तालुक्यातील सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय राहिले आहेत. युवकांशी असलेला त्यांचा संपर्क, विविध सामाजिक उपक्रमांमधील सहभाग आणि स्थानिक पातळीवर नागरिकांच्या प्रश्नांसाठी केलेले काम यामुळे त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. याच सामाजिक बांधिलकीची दखल घेत त्यांना ‘समाजरत्न’ प्रवर्गातील क्रीडारत्न पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. त्यामुळे हा पुरस्कार केवळ व्यक्तीचा सन्मान नसून मावळच्या सामाजिक कार्याचीही दखल मानली जात आहे.

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशभर साजरा होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्रासोबतच कला, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींनाही पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यासाठी समितीचे प्रमुख प्रा. नितीन शिंदे, सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता सुरेंद्र कालीरामण तसेच आशियाई सुवर्णपदक विजेते प्रा. प्र. अमोल साठे यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

मावळमध्ये सामाजिक कामातून उभे राहिलेल्या बाळासाहेब घोटकुले यांच्या कार्याला या पुरस्काराच्या माध्यमातून व्यापक स्तरावर मान्यता मिळत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे. विशेषतः युवक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरणार आहे. दरम्यान, पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मावळ तालुक्यातील विविध स्तरातून बाळासाहेब घोटकुले यांचे अभिनंदन होत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक
– कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू
– मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन
– मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक


dainik maval jahirat

Previous Post

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

Next Post

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
Meritorious students teachers felicitated at ceremony organized by Lonavala Municipal Council

लोणावळ्यात नगरपरिषदेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.