Dainik Maval News : मावळ तालुक्यात बेकायदेशीररित्या गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. आरोपीकडून ३३२ ग्रॅम वजनाचा गांजा आणि दुचाकी असा एकूण सुमारे १ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास नवलाख उंब्रे रोडवरील श्री दत्त मंदिराजवळील मोकळ्या जागेत करण्यात आली.
याप्रकरणी वसीम मोहम्मद शेख (पोलीस हवालदार) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप शांताराम तुळवे (वय ३६, व्यवसाय वॉशिंग सेंटर व गॅरेज, रा. करंजविहीरे, ता. खेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप तुळवे याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या ३३२ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. या गांजाची किंमत १ लाख १९ हजार ५२० रुपये असून, पिशवीसह त्याचे वजन ३३८ ग्रॅम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच त्याच्याकडून व्हेस्पा कंपनीची दुचाकी (एमएच १४ एलसी ५५२३) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १ लाख २६ हजार १५० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक
– कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू
– मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन
– मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक


