पुणे – मुंबई रेल्वे मार्गावर ( pune mumbai rail service ) लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ ( Lonavala) झालेलल्या तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी (दि. 18) काहीकाळ रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. लोणावळा जवळ मळवली ते कामशेत मार्गादरम्यान रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटली होती. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा सोमवारी सायंकाळी विस्कळीत झाली होती. तांत्रिक ब्लॉक घेऊन ही समस्या दूर करण्यात आली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
सायंकाळी चारच्या सुमारास कामशेत ते मळवली स्थानक दरम्यान एका रेल्वे चालकाच्या लक्षात ही बाब आली. तेव्हा चालकाने तातडीने याबाबतची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. रेल्वे अधिकाऱ्यांनी तिथे लगेचच तांत्रिक ब्लॉक घेऊन मार्गावरील गाड्या थांबवल्या होत्या. तसेच ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास दोन तासांचा कालावधी लागला. त्यामुळे या मार्गावरील 6 एक्स्प्रेस गाड्या आणि 3 लोकल गाड्यांना विलंबाने धावल्या. ( pune mumbai rail service disrupted technical fault between Malvali to Kamshet stations )
मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘लोणावळा ते पुणे या दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे काही काळ रेल्वे सेवेला फटका बसला. हा तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला असून, सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. रेल्वे गाड्यांना विलंब होऊन प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल रेल्वे दिलगिरी व्यक्त करत आहे,’ असे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– वडगाव-कातवीमधील 250 एकर औद्योगिक क्षेत्र संपादनमुक्त, स्थानिकांना मोठा दिलासा; आमदार सुनिल शेळकेंची माहिती
– मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातील 71 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय, तोकड्या कपड्यांनी गेल्यास प्रवेश नाकारणार, वाचा यादी
– लोणावळा शहराजवळ अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्यांना पोलिसांचा दणका, हॉटेल मालकासह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल । Lonavala Crime News