व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

र…राजकारणाचा! ज्याने लेकाचा पराभव केला, त्याच्याच प्रचारासाठी पित्याची धावाधाव । Maval Lok Sabha 2024

राजकारणात कधी काय होईल, हे कुणीही सांगू शकत नाही. तसेच राजकारणात कोणीही कधीही परमनंट मित्र किंवा परमनंट शत्रू नसतो, असेही म्हटले जाते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 8, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Ajit-Pawar-Shrirang-Barne-Parth-Pawar

Photo Courtesy : Team Dainik Maval


राजकारणात कधी काय होईल, हे कुणीही सांगू शकत नाही. तसेच राजकारणात कोणीही कधीही परमनंट मित्र किंवा परमनंट शत्रू नसतो, असेही म्हटले जाते. मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या हीच राजकीय परिस्थिती सर्वांना पाहायला मिळत आहे. एकेकाळी ज्याने आपल्या लेकाचा पराभव केला होता, त्याच्याच प्रचारासाठी आज पित्याला धावाधाव करत लागत असल्याचे मावळ लोकसभेत संपूर्ण राज्य पाहात आहे. आणि हा पिता दुसरा तिसरा कोणीही नसून स्वतः महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ अर्थात राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेच आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

अजित दादा यांचा पक्ष सध्या राज्यात सत्तेत असून महायुतीचा भाग आहे. लोकसभा निवडणूकीत मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेना पक्षाला अर्थात एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. त्याठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा तिकीट मिळाले आहे. बारणे तिसऱ्यांदा निवडणूकीत उभे राहिले असून खासदारकीची हॅटट्रीक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या विजयासाठी महायुतीतील सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते झाडून तयारीला लागले आहेत. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा यांचाही समावेश आहे. परंतू इतर कुणापेक्षाही अजित पवार यांच्यासाठी मावळ लोकसभेची जागा आणि येथील प्रचार करणे म्हणजे कडू आठवणींना उजाळा देण्यासारखे आहे. कारण याच मतदारसंघात त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचा गेल्या लोकसभेला पराभव झाला होता, आणि ज्यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला ते होते स्वतः श्रीरंग बारणे. ( Maval Lok Sabha Constituency NCP Ajit Pawar Campaigning For Shiv Sena Candidate Shrirang Barne Even Parth Pawar Defeated By Barne In 2019 )

मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराच्या अर्था श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या सर्व घटक पक्षांची संयुक्त बैठक आज (दि. 8 एप्रिल) पार पडली. या बैठकीला स्वतः अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः महायुतीच्या कार्यकर्त्यांना तंबी दिली. बारणे यांच्या प्रचारात कुणीही कमी पडू नये, याबद्दल सुचना केल्या. अजित पवार यांच्या सुचना या सध्याच्या राजकारणाला साजेशा आहेत. परंतू या निमित्ताने राज्यातील जनतेला राजकारणाचा र शिकायला मिळतो आहे, हे नक्की.

अधिक वाचा –
– ‘नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी श्रीरंग बारणे यांचा विजय महत्वाचा’ – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
– मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
– मोठी बातमी! लोकसभा निवडणूकीत मतदानाच्या दिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय


dainik maval jahirat

Previous Post

महत्वाचे! मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीत बदल, रविवारपासून ‘या’ वेळेत अवजड वाहनांना ‘नो एन्ट्री’

Next Post

‘मी कुणाला कुठेही पाठवलं नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, हलक्या कानाचे राहू नका, विरोधी उमेदवाराला भेटायला जाऊ नका’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ajit-Pawar

'मी कुणाला कुठेही पाठवलं नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, हलक्या कानाचे राहू नका, विरोधी उमेदवाराला भेटायला जाऊ नका'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.