व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भाजे गावातील छत्रपती शिवरायांच्या 16 फुटी अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण; संपूर्ण गाव झालं शिवमय

मावळ तालुक्यातील भाजे गावात गुढीपाडवा सणाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 10, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
shivaji-maharaj-statue-bhaje-village

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील भाजे गावात गुढीपाडवा सणाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कार्ला लेणीपासून जवळ असलेले आणि किल्ले लोहगड व विसापूर यांच्या पायथ्याशी असलेले ऐतिहासिक भाजे गाव. या भाजे गावाच्या हद्दीतही भाजे लेणी आहे. अशा ऐतिहासिक आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध गावात आता शिवरूप अवतरले आहे. भाजे गावात लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा 16 फूट उंच अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वाधिक उंची असलेला हा एकमेव पुतळा आहे. मागील दोन वर्षापासून सदरचा पुतळा बसवण्यासाठी चौथरा बनवण्याचे काम व सोबतच पुतळा बनविण्याचे काम देखील सुरू होते. साधारण 18 फूट उंचीचा चौथरा येथे बनवण्यात आला असून त्यावर महाराजांचा 16 फूट उंचीचा पुतळा बसवण्यात आला आहे. लोक सहभागातून हे काम करण्यात आले असून भाजे गावातील प्रत्येकाचा त्यामध्ये हातभार लागला आहे. सोबतच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तीने देखील या कामी मदतीचा हात दिला आहे. ( 16 feet tall statue of Chhatrapati Shivaji Maharaj was unveiled at Bhaje village Maval taluka )

सर्वांच्या मदतीने व सहकार्याने अतिशय सुंदर अशा पद्धतीने भाजे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याला चारही दिशेने राजमुद्रा बसवण्यात आली आहे. पुतळ्याच्या परिसरामध्ये सुशोभीकरण करण्यात आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी चार वाजता पारंपारिक वेशभूषेत व पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये मळवली ते भाजे दरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये ढोल लेझीम पथक, ऊंट, घोडे, डीजे, विद्युत रोषणाई सह शिवकालीन मर्दानी खेळांचा सहभाग होता.

पारंपरिक रथ व बैलगाड्यांसह पारंपारिक वेशभूषेत ग्रामस्थांबरोबर परिसरामधील नागरिकही या सोहळ्यात सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. यात महिला व लहान मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. या सोहळ्याच्या निमित्ताने भाजे गावातील वातावरण शिवमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला होता. या अनावरण सोहळ्यास तालुक्यातील लोकप्रतिनिधींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. काही सांस्कृतिक कार्यक्रम व महाराजांचे पोवाडे या ठिकाणी सादर करण्यात आले. आकर्षक अशी फटाक्यांची आतषबाजी यावेळी करण्यात आली.

अधिक वाचा –
– ‘कुणी पैसे वाटले तर घ्या, मत मात्र महाविकास आघाडीलाच करा’, मावळचे उमेदवार संजोग वाघेरेंचा मतदारांना अजब गजब सल्ला । Maval Lok Sabha
– लहान मुलांच्या उन्हाळ्याच्या सुटीचे नियोजन पालकांनी कसे करावे? पाहा प्रसिद्ध बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांची खास मुलाखत
– देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे! मूळ संकल्पना पुण्याची, शहरातील 35 गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे


dainik maval jahirat

Previous Post

‘जागरण-गोंधळ या धार्मिक विधीमध्ये काही लोकांनी अश्लीलता आणून त्याचा व्यवसाय चालू केलाय’

Next Post

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर, आतापर्यंत 14 हजार तक्रारींचे निवारण, पुणे जिल्हा आघाडीवर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ECI

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर, आतापर्यंत 14 हजार तक्रारींचे निवारण, पुणे जिल्हा आघाडीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
tikona-fort-maval

तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या मध्य प्रदेशातील तीन पर्यटकांची ‘शिवदुर्ग मित्र’कडून थरारक सुटका

October 4, 2026
Talegaon Dabhade Property cards PR cards distributed Kaikadi community at hands of MLA Sunil Shelke

Talegaon Dabhde : आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कैकाडी समाजातील १७ कुटुंबांना मिळकत पत्रिकांचे (पीआर कार्ड) वाटप

October 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.