व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्री एकविरा देवी चैत्री यात्रा निमित्त पोलिसांकडून चोख बंदोबस्त; यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सुक्ष्म नियोजन – वाचा सविस्तर

सालाबाद प्रमाणे यावर्षी दिनांक 9 एप्रिल ते 16 एप्रिल 2024 या कालावधीत कार्ला गडावरील आई एकवीरा देवीचा चैत्री यात्रा उत्सव साजरा होत आहे. यात यात्रेतील रविवार (14 एप्रिल) ते मंगळवार (16 एप्रिल) हे दिवस महत्वाचे आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 13, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
Ekvira-Devi

File Image - Ekvira Devi


चैत्र शुद्ध सप्तमी अर्थात कार्ला येथील आई एकविरा देवीचा पालखी सोहळा यंदा सोमवारी, दिनांक 15 एप्रिल रोजी होणार आहे. सालाबाद प्रमाणे यावर्षी दिनांक 9 एप्रिल ते 16 एप्रिल 2024 या कालावधीत कार्ला गडावरील आई एकवीरा देवीचा चैत्री यात्रा उत्सव साजरा होत आहे. यात यात्रेतील रविवार (14 एप्रिल) ते मंगळवार (16 एप्रिल) हे दिवस महत्वाचे आहेत. यात्रेच्या कालावधीत भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पुणे ग्रामीण पोलिसच्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी एकविरा देवी गडावर भेटी देऊन मंदिर परिसराची पाहणी केली होती. तसेच सबंधित विभागाच्या बैठका घेऊन यात्रा उत्सवाच्या अनुषंगाने सुचना दिल्या होत्या. त्याच्या सुचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस प्रशासन, महसुल प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग, वनविभाग, तसेच मंदीर प्रशासन यांच्याकडून यात्रेची सर्व तयारी करण्यात आली आहे. ( On Occasion of Ekvira Devi Yatra Proper Arrangement Done By Pune Lonavala Gramin Police Read in Detail )

पोलिस प्रशासनाकडून खालील प्रमाणे उपाय योजना करण्यात आल्या आहेत;
1) माननीय उपविभागीय अधिकारी मावळ मुळशी, उपविभाग, पुणे यांचे कार्यालयाकडून फौ.प्र.सं. 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये दिनांक 12/04/2024 रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते दिनांक 16/04/2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत या कालावधीत मौजे वेहेरगाव आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शोभेची दारू उडवणे, फटाके गडावर नेणे आणि वाजविणे, वाद्य वाजविणे, एकाच प्रकारची वेशभुषा (विशेषतः टी शर्ट परिधान करणे) पशू-पक्षी यांचा बळी न देणे आणि त्यांना मंदिर परिसरात न सोडणे, मंदिर परिसरात असलेले कार्ला लेणी, ऐतिहासिक वास्तु आणि शिल्पांना हानी न पोहचवणे किंवा त्याचे विद्रुपीकरण न करणे इ. प्रतिबंधात्मक आदेश काढलेले आहेत.

2) माननीय जिल्हाधिकारी तथा राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे यांनी दिनांक 15 एप्रिल ते 16 एप्रिल 2024 या कालावधीत मौजे वेहेरगाव आणि परिसरातील इतर गावामध्ये सर्व प्रकारच्या मद्य विक्री अनुज्ञप्ती बंद करण्याचे आदेश पारित केलेले आहेत.

3) माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांनी दिनांक 14 एप्रिल रात्री 12 वाजलेपासून ते दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत या कालावधीत अवजड आणि मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी केलेली असून मोठ्या वाहनांसाठी अग्रसेन पॅलेस (हॉटेल) पार्नंग, लाजवंती कॉलेज पार्किंग, दुर्गा परमेश्वरी पार्किंग ई. ठिकाणी भाविकांनी आपली अवजड वाहने पार्किंग करण्याबाबत आदेश पारित केलेले आहेत.

तसेच दिनांक 15 एप्रिल संपूर्ण दिवस (24 तास – रात्री 12 ते 12 वा.) या कालावधीत जुना पुणे मुंबई (एन.एच. 48) या महामार्गावरील जड वाहतूक, ही वडगाव फाटा ते कुसगाव (बु) टोलनाका दरम्यानची जड-अवजड वाहनांची वाहतुक बंद करून ती वडगाव फाटा ते पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरून कुसगाव (बु) टोलनाका अशी जातील आणि दिनांक 15 एप्रिल 2024 संपूर्ण दिवस (24 तास – रात्री 12 ते 12 वा.) या कालावधीत जुना मुंबई-पुणे (एन.एच. 48) या महामार्गावरील कुसगाव (बु) टोलनाका ते वडगाव फाटा या दरम्यानची जड-अवजड वाहनांची वाहतुक बंद करून ती नवीन मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून वडगाव फाटा अशी वळवण्याबाबत आदेश केलेले आहेत.

4) पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत वेहेरगाव यांच्याकडून श्री एकवीरा देवी मंदीर परिसर, कार्ला लेणी गड, गडावर जाण्या-येण्याकरीता असलेल्या पायऱ्या तसेच कार्ला फाटा ते वेहेरगाव यादरम्यान असलेले अतिक्रमण काढून भाविकांना येण्या-जाण्यासाठीचा रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे.

इतर उपाययोजना –
त्याचप्रमाणे भाविकांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी श्री एकविरा देवी गड, ग्रिनफिल्ड चौक या ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात करण्यात आलेली आहेत. जागो जागी मोबाईल टॉयलेट बसवण्यात आलेली आहेत. गड व परिसरात अग्निशमन यंत्रणा पाचारण करण्यात आलेली आहे. तसेच श्री एकविरा देवी मंदिर पायथा परिसर, पायऱ्यावर तसेच वेहेरगाव परिसरात असणारे सर्व हॉटेल दुकानदार विविध वस्तुविकी स्टॉल यामध्ये देखील दुकानदार यांना लहान आकाराचे अग्निशमन यंत्रणा ठेवण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत.

मंदिर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा व स्वयंमसेवक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. जागोजागी पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलेली असून भाविकांना पोलीस मदतीसाठी डायल 112 या नंबरवर फोन करून मदत मागण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच शिस्तीत यात्रा उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक (भा.पो.से) आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी केलेले आहे.

अधिक वाचा –
– मावळ विधानसभा मतदारसंघातील साडेतीन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण । Maval Lok Sabha 2024
– शिरगाव येथील शारदाश्रम प्राथमिक आश्रमशाळेला 7.50 लाखाचे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र प्रदान । Maval News
– मावळ लोकसभा मतदारसंघ : पहिल्यांदाच घड्याळाशिवाय होणार मावळ लोकसभेची निवडणूक । Maval Lok Sabha


dainik maval jahirat

Previous Post

‘ऐतिहासिक तळ्याभोवतीचे कठडे तातडीने दुरुस्त करा आणि तळ्याची स्वच्छता करून त्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारा’ । Vadgaon Maval

Next Post

“भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याची आणि पवार साहेब, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ही वेळ”

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sanjog-Waghere-Maval

"भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याची आणि पवार साहेब, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ही वेळ"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.