पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेच्या मान्यतेने वडगाव मावळमध्ये युथ, ज्युनिअर आणि सिनियर गटाच्या जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. तसेच राज्य स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आल्या. दिनांक 5 नोव्हेंबर आणि दिनांक 6 नोव्हेंबर अशा दोन दिवसांत या स्पर्धा घेण्यात आल्या. सुनिलभाऊ ढोरे युवामंच आणि सह्याद्री जिमखाना यांच्यावतीने स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ( Weightlifting competition at vadgaon maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
View this post on Instagram
आमदार सुनिल शेळके आणि सुनिल गणेशआप्पा ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात या स्पर्धांना शनिवारी सुरुवात झाली. अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला असून स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
अधिक वाचा –
– ‘इंद्रायणी कॉलेजच्या इमारतीच्या बांधकामात कुणी राजकारण करुन अडथळा केल्यास..’, बाळा भेगडेंचा इशारा
– आणिबाणीत बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तींना मिळणार मानधन, मावळ तालुक्यातील 19 जणांचा समावेश