तळेगाव दाभाडे पोलिसांनी आंबी (ता. मावळ) येथे 2 मे रोजी केलेल्या कारवाईत एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून छाप्यात 1 लाख रुपये किमतीचे गावठी दारूचे रसायन जप्त करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दिनांक 2 मे रोजी सायंकाळी 6.55 वाजता पोलिसांनी प्राप्त माहितीच्या आधारे आंबी गावच्या हद्दीत ओढ्याच्या काठी छापा टाकला. त्यावेळी आरोपी तिथे गावठी दारू तयार करताना मिळून आला. पोलिस शिपाई भरत श्रीमंत माने (वय 40, पिंपरी चिंचवड पोलिस) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी जसवंत राहुल राठोड (वय 20 रा. आंबी, ता. मावळ) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Gavathi liquor chemical seized in police raid at Ambi by Talegaon MIDC Police Maval Crime )
तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (क) (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमुद ठिकाणी छापा टाकला असता आरोपी हा हातभट्टी दारू तयार करण्यासाठी आवश्यक 1 लाख 3 हजार रुपये किमतीचे 5000 लीटर रसायन भीजत घालताना मिळून आला आहे. पोलिस हवालदार भवारी हे पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– ‘काँग्रेसच्या राजवटीत 100 पाठवले की 15 मिळायचे आता थेट पैसे खात्यात येतात’, लोणावळ्यात चित्रा वाघ यांच्याकडून बारणेंचा प्रचार
– मोठी बातमी ! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंद ठेवण्याचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Pune News
– Maval Lok Sabha : मावळमध्ये उद्धव ठाकरेंबाबत सहानुभूतीची सुप्त लाट ? संजोग वाघेरेंना होणार फायदा… । विशेष लेख