‘श्रीरंग बारणें यांना आता कोणीही मतदार स्विकारायला तयार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या मनात परिवर्तनाची लाट तयार झाली आहे. आता कोणी कितीही आव आणला तरी बारणे यांच्यावरील निष्क्रिय हा कलंक पुसला जाणार नाही. कारण तो सलग दहा वर्ष लागला आहे. मित्र पक्ष देखील त्यांना स्विकारायला तयार नाहीत. मात्र केंद्रातील भूत मानेवर असल्यामुळे प्रचार करावा लागतोय, अशी मित्र पक्षांची परिस्थिती आहे.’ अशा शब्दांत सहकार महर्षी माऊली दाभाडे यांनी श्रीरंग बारणे यांच्यावर टीका करत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते लोणावळा येथे मविआच्या मेळाव्यात बोलत होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोणावळा येथे नुकताच महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी माऊली दाभाडे बोलत होते. तसेच या मेळाव्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते मच्छिंद्र खराडे, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कवीश्वर, गुरव समाजाचे पुणे जिल्हा अध्यक्ष शंकर शिर्के, लोणावळा शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, तळेगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, माजी नगरसेवक सुनील इंगुळकर, युवक नेते फिरोज बागवान, तळेगाव शहर अध्यक्ष नंदकुमार कोतूळकर, ज्येष्ठ नेते दादा भोंगाडे, अल्पसंख्यक अध्यक्ष जकिर शेख, माजी नगरसेवक भालचंद्र खराडे, माजी नगराध्यक्ष राजू गवळी व सुधीर शिर्के, शुभम जोशी, सेवादलाचे अध्यक्ष सुनील मोगरे, लक्ष्मण दाभाडे, माजी युवक अध्यक्ष दत्ता दळवी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ( Maval Lok Sabha Constituency Election Mauli Dabhade criticism of Shrirang Barane )
माऊली दाभाडे बोलताना म्हणाले, ‘भारत देश हा लोकशाही देश आहे. येथे प्रत्येकाला चांगलं वाईट निवडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. मागील दहा वर्ष मावळ लोकसभेचे नेतृत्व करण्याची संधी मतदारांनी बारणे यांना दिली. आम्ही सुध्दा त्यांचा प्रचार केला होता. मात्र त्यांनी दहा वर्षात एकाही कामाची चुणूक दाखवली नाही. असा नामधारी खासदार काय कामाचा आहे. त्या विरुध्द महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका झाली. त्यांचे वडील यांनी त्या भागात औद्योगिक क्रांती घडवली अशी खानदानी परंपरा असलेला उमेदवार असल्याने यावेळी मतदारांनी भावनेवर आधारित नाहीत तर मेरिटवर आधारित व स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी काम करणारा उमेदवार लोकसभेत पाठवण्याचा संकल्प केला असल्याने मावळातून किमान 50 हजार मतांचे मताधिक्य संजोग वाघेरे यांना मिळवून देऊ,’ असा विश्वास दाभाडे यांनी व्यक्त केला.
‘महायुतीमधील राष्ट्रवादीने खासदारांनी मावळ मतदारसंघात विकासाचे काय दिवे लावले ते सांगा, अशी विचारणा काही दिवसांपूर्वी उघडपणे केली होती. तर भाजपाने बारणे नावाचा निष्क्रिय उमेदवार बदला, आम्ही काम करणार नाही, अशी थेट भूमिका मांडली होती. तरी देखील युतीच्या डोक्यावर मिऱ्या वाटत पुन्हा निष्क्रियतेचा ठपका असलेल्या बारणे यांना मावळात उमेदवारी शिंदे यांनी दिली,’ असा जोरदार हल्लाबोल माऊली दाभाडे यांनी लोणावळ्यात मेळाव्यात बोलताना केला आहे.
अधिक वाचा –
– संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे उतरणार मैदानात ! Maval Lok Sabha
– रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि पॉस्को कंपनीच्या वतीने तळेगाव दाभाडे वाहतूक पोलिसांना संगणक संच भेट । Talegaon Dabhade
– विविध धार्मिक कार्यक्रमांसह संत शिरोमणी श्री गोरोबाकाका यांची 707 वी पुण्यतिथी तळेगाव येथे साजरी । Talegaon Dabhade