मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज थंड झाल्या. सर्वच आघाड्यांनी आपापल्या उमेदवारासाठी शेवटच्या दिवशी जोरात प्रचार केला. मावळ लोकसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार हे सांगायला आता कोणा भविष्यवेत्याची गरज नाही. एकेवेळी ‘संजोग वाघेरे यांना ओळखायला नाकारणारे बारणे’ आता मात्र ‘मला ओळखायला लागले’ अशी टीका शेवटी शेवटी वाघेरेंनी केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ लोकसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनीही अखेरच्या दिवशी जोरदार प्रचार केला. शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटलांची रॅली, तसेच पदयात्रा आणि सभा देखील पार पडल्या. यावेळी वाघेरे यांनी माध्यमांशी बोलताना, बारणे यांना एक टोला लगावला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बारणे मला ओळखायला लागले, हेच माझं नशीब समजतो, अशी खोचक टीका वाघेरे यांनी बारणेंवर केली. ( Maval Lok Sabha Constituency Sanjog Waghere’s criticism of Shrirang Barane )
मावळमधून 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेने पहिल्यांदा विजय मिळवला. तेव्हापासून हा मतदारसंघ शिवसेना पक्षाकडे राहिला. 2009 साली गजानन बाबर यांच्या नंतर 2014 आणि 2019 अशी सलग दोनदा शिवसेनेचे श्रीरंग बारणे निवडून आले. 2022 साली शिवसेना पक्षात फुट पडली. त्यात श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदे यांच्या गोटात गेले. त्यांना तिसऱ्यांदा निवडणूक लढवायचीच होती, आणि त्यांनी तिकीटही मिळवले. त्याचवेळी त्यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे ह्यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे मावळची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार, यांत शंका नाही.
अधिक वाचा –
– ‘प्रत्येकाच्या मनात मशाल हे एकच चिन्ह असायला हवं.. या मशालीने भाजपाला तडीपार करायचंय’ – आदित्य ठाकरे । Maval Lok Sabha
– मावळ लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कामशेत पोलिसांकडून शहरात शक्ती प्रदर्शन ! Kamshet News
– ‘मी मॅच फिक्सिंग करत नाही…’ संजोग वाघेरेंसोबत ‘तेव्हा’ नेमकं काय झालं? अजितदादांनी सर्वांसमोर स्पष्ट केलं, वाचा… । Maval Lok Sabha