व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 20, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महावितरणचा गलथान कारभार, मावळ तालुक्याचे मुख्यालय वडगाव शहरात तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव ! Vadgaon Maval

मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या शहरातच महावितरणचा हा गलथान कारभार पाहता, आता त्याविरोधात राजकीय पक्षांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 21, 2024
in लोकल, शहर
Electricity problem in Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ शहरात गुरूवार (दि. 16 मे) पासून विजेची समस्या सुरु आहे. अचानक वीज जाणे. तासनतास वीज गायब होणे. सतत वीज येणे – जाणे यासह रात्री अपरात्री विजपुरवठा खंडीत होणे, यामुळे वडगाव शहरातील नागरिक त्रस्त झाले आहे. मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या शहरातच महावितरणचा हा गलथान कारभार पाहता, आता त्याविरोधात राजकीय पक्षांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. सोमवारी (दि. 20 मे) शहर भाजपाकडून महावितरणला याबाबत निवेदन देण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

novel skill dev ads

भारतीय जनता पार्टी, वडगाव मावळ शहर अध्यक्ष संभाजी म्हाळसकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने वडगाव येथील महावितरण कंपनी च्या उपविभागीय कार्यालयात जाऊन उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे आपले निवेदन सादर केले. ( Electricity problem in Vadgaon Maval BJP letter to mahavitaran officers )

tata ev ads

काय आहे निवेदन ?
“गुरुवार दिनांक 16 मे 2024 रोजी वडगांव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस झाला. त्यामुळे या परिसरात मोठी वित्तहानी झाली. अनेक घराचे पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली. गुरुवार दिनांक 16 मे पासून ते रविवार दिनांक 19 मे पर्यंत विज पुरवठ्याचा लपंडाव सुरु होता. गुरुवार दिनांक 16 मे रोजी सायंकाळी 5 वाजता वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर सुमारे 27 तासांच्या प्रदिर्घ कालावधी नंतर वीज पुरवठा शुक्रवारी दिनांक 17 मे च्या रात्री उशीरा सुरु झाला. वडगाव शहर हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने ग्रामीण भागातील नागरिक त्यांची सरकारी कामे करण्यासाठी वडगावंमध्ये येत असतात.

24K KAR SPA ads

परंतू गलथान कारभारामुळे त्याचा त्यांना नाहक व प्रचंड त्रास तालुक्यातील व वडगाव शहरातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण यांना होत आहे. आपल्या भोंगळ कारभारामुळे वीज नसल्याकारनांनी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल देखील बुडाला आहे. वडगांव शहरामध्ये असणारे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वीज तक्रारीचे कामे तोंड पाहून करतात. अनेक नागरिकांचे फोन देखील उचलत नाही. त्यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत.

तरी आपणांस या निवेदनाद्वारे सुचित करण्यात येते की, वडगाव व कातवी शहरात वीज पुरवठा नियमित करणेकामी कार्यवाही करावी, अन्यथा पुढील 8 दिवसांत आपल्या कार्यलयावर वडगाव शहर नागरिक यांच्या वतीने धडक मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. त्याची सर्वस्वी जबाबदारी आपलेवर राहील.”

अधिक वाचा –
– अवकाळी पावसात हायमास्ट दिव्यांची पडझड, वडगाव राष्ट्रवादीचे नगरपंचायत प्रशासनाला निवेदन । Vadgaon Maval
– मोठी बातमी ! इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, संपूर्ण देशावर शोककळा । Iran President Ebrahim Raisi Helicopter Crash
– अखेर वडगाव नगरपंचायत प्रशासन जागं झालं ! शहरातील सर्व होर्डींगची केली पाहणी, अनधिकृत होर्डिंग धारकांवर होणार कारवाई


dainik maval ads

Previous Post

पिंपरी-चिंचवड शहर फुल मार्केट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवकुमार बोडके यांची निवड । Sanjeev Kumar Bodake

Next Post

बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचाच डंका ! कोकण विभाग पुन्हा अव्वल, वाचा निकाल सविस्तर । HSC Exam2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
SSC-HSC-Exam-Result

बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचाच डंका ! कोकण विभाग पुन्हा अव्वल, वाचा निकाल सविस्तर । HSC Exam2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पवन मावळ मराठी पत्रकार संघाची स्थापना : अध्यक्षपदी रवी ठाकर, उपाध्यक्षपदी अभिषेक बोडके, तर कार्याध्यक्षपदी विकास वाजे

पवन मावळ मराठी पत्रकार संघाची स्थापना : अध्यक्षपदी रवी ठाकर, उपाध्यक्षपदी अभिषेक बोडके, तर कार्याध्यक्षपदी विकास वाजे

July 20, 2025
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची फेररचना – पाहा तुमचे गाव कोणत्या गटात आणि गणात असणार

July 20, 2025
BJP demands immediate construction of subway or flyover at four places in Vadgaon Maval limits

वडगाव मावळ हद्दीतील ‘या’ चार ठिकाणी तातडीने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल उभारण्याची शहर भाजपाची मागणी । Vadgaon Maval

July 19, 2025
Good news PMPML starts new tourist bus service on Pune to Lonavala route

आनंदाची बातमी ! ‘पीएमपीएमएल’कडून पुणे ते लोणावळा मार्गावर नवीन पर्यटन बससेवा सुरू । PMPML Tourist Bus Pune to Lonavala

July 18, 2025
Dr Babasaheb Ambedkar memorial

लोणावळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी २ कोटी ५६ लक्ष निधीची मंजुरी

July 18, 2025
10-foot python found in Aundhe village in Maval

मावळमधील औंढे गावात आढळला 10 फुटांचा अजगर

July 18, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.