महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल (HSC Exam 2024 Result) आज (दि. 21 मे) जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा इयत्ता बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. यात सर्वाधिक 97.51 टक्के निकाल कोकण विभागाचा, तर सर्वाधिक कमी 91.95 टक्के निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातील (जि. पुणे) आकडेवारी देखील आता समोर आली आहे. मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल 93.72 टक्के इतका लागला आहे. मावळ तालुक्यातील 4065 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 3791 विद्यार्थी पास झाले आहेत. 299 विद्यार्थी डिस्टिंक्सनमध्ये आले असून 993 विद्यार्थी प्रथम श्रेणी मिळवून पास झाले आहेत.
न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज भोयरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील यंदा चमकदार कामिगिरी केली आहे. विद्यालयाचा कॉमर्स विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे, तर आर्ट्स विभाग 77.77 टक्के निकाल लागला आहे. विद्यालयाचा एकत्रित निकाल 90.16 टक्के इतका आहे.
न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज भोयरे – कला विभाग निकाल
प्रथम – थरकुडे भाऊ मचिंद्र 64.83 %
द्वितीय – लामगण समृध्दी गजानन 64.50 %
तृतीय – आगीवले पवन किसन 53.83 %
न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज भोयरे – वाणिज्य विभाग निकाल
प्रथम – आडीवळे क्रांती काशिनाथ 85.83 %
द्वितीय – जाधव तेजस बाळू 80.50 %
तृतीय – शिंगाडे विद्या गणेश 78.83
बारावीच्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राचार्य, शिक्षक – शिक्षकेत्तर वृंद, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन आणि कौतूक करण्यात आले आहे. ( HSC Exam 2024 Result Declared Check Here Link Maval taluka 12th result 93.73 percent )
अधिक वाचा –
– बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचाच डंका ! कोकण विभाग पुन्हा अव्वल, वाचा निकाल सविस्तर । HSC Exam2024
– महावितरणचा गलथान कारभार, मावळ तालुक्याचे मुख्यालय वडगाव शहरात तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव ! Vadgaon Maval
– पिंपरी-चिंचवड शहर फुल मार्केट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवकुमार बोडके यांची निवड । Sanjeev Kumar Bodake