व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांवर कारवाई, तळेगाव दाभाडे पोलिसांची दबंग कामगिरी । Talegaon Dabhade Police

तळेगाव दाभाडे पोलिसांनी सोमवारी (दि. 20 मे) केलेल्या कारवाईत बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 22, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Crime

File Photo : Crime


तळेगाव दाभाडे पोलिसांनी सोमवारी (दि. 20 मे) केलेल्या कारवाईत बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तळेगाव पोलिसांनी सोमवारी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याजवळ ही कारवाई केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सचिन किसन शिंदे (38, रा. लोणीकंद, ता. हवेली), गौरव कमलाकर शिंदे (20, रा. लोणीकंद, ता. हवेली), अजिंक्य दादासाहाबे म्हस्कुटे (25, रा. खामगाव, ता. दौंड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे मुंबई महामार्गाने एक चारचाकी वाहन पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात आहे. चारचाकीमधील लोकांकडे पिस्तूल असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली. त्यानुसार तळेगाव पोलिसांनी घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला सापळा लावून वाहन अडवले. वाहनामधील तिघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता पोलिसांना एक पिस्तूल आणि चार काडतुसे आढळली. याबाबत तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ( Talegaon Dabhade police action against three persons for possession of illegal weapons )

तिन्ही संशयित पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सचिन शिंदे याच्या विरोधात 2012 मध्ये लोणीकंद पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. तसेच 2021 मध्ये लोणीकंद पोलिस ठाण्यात सचिन आणि गौरव शिंदे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर 2022 मध्ये चिखली पोलिस ठाण्यात गौरव शिंदे आणि अजिंक्य म्हस्कुटे यांच्या विरोधात शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे.

ही कामगिरी पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलिस आयुक्त देवीदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण रायन्नवार, उपनिरीक्षक विलास गोसावी, सहायक फौजदार दिलीप कदम, पोलिस अंमलदार किशोर गिरीगोरावी, प्रकाश जाधव, प्रीतम सानप, हर्षद कदम यांच्या पथकाने केली.

अधिक वाचा –
– पुणे हिट अँड रन केस : पुणे शहरातील ‘ते’ दोन पब बंद करण्याचे थेट जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Pune Hit and Run Case
– ‘राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले असते तर…’, निकालाआधीच श्रीरंग बारणेंनी राष्ट्रवादीकडे दाखवले बोट । Maval Lok Sabha
– बारावी बोर्ड परीक्षेत करिना देवकर प्रथम, कार्ला येथील श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेजचा यंदा 94 टक्के निकाल


Previous Post

सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली शिंदे यांची निवड । Maval News

Next Post

बारावी बोर्ड परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून विशेष उपक्रम सुरु, जाणून घ्या

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
failed students

बारावी बोर्ड परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून विशेष उपक्रम सुरु, जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.