तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी नगरपरिषद प्रशासन सक्रिय झाले आहे. तळेगावचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी यासाठी चार पथके तयार केली आहे. या पथकांकडून लवकरच शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग काढली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘ज्या ठिकाणी अनाधिकृत होर्डिंग आहेत. त्या मालकांकडून होर्डिंग काढण्याचा खर्च घ्यावा, जर त्यांनी खर्च दिला नाही तर त्याच्या मालमत्ता करातून तो वसूल करावा, किंवा त्याचे पाणी कनेक्शन बंद करावे. होर्डिंग काढल्यानंतर स्ट्रक्चरसाठी वापरलेले स्टील नगर परिषदेमध्ये जमा करावे. तसेच जर कोणाला होर्डिंग लावायचे असेल तर नगर परिषदेची रीतसर परवानगी घ्यावी. ते लावण्याच्या सर्व नियम, अटी पूर्ण कराव्यात. तसेच कोणी अनधिकृत स्ट्रक्चर काढताना अडथळा आणला तर त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करा,’ अशा स्पष्ट सुचना मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ( Action initiated to remove unauthorized hoardings within Talegaon Municipal Council limits )
मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या होर्डींग दुर्घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्या घटनेनंतर नगर परिषद प्रशासनाने तळेगाव हद्दीतील सर्व होर्डींगचे ऑडिट केले, त्यात होर्डिंग्ज अनधिकृत आढळून आल्याने ते काढण्याचा कार्यवाही मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आली आहे. नगररचनाकार विश्वजीत कदम, सहाय्यक गणेश कोकाटे, विरेंद्र नार्गुंडे, जयंत मदने, सिद्धेश्वर महाजन, माजी सभापती महेश फलके, शेखर मुऱ्हे आदी यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– गाव करी ते राव काय करी ! कुसगाव ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पवित्र्याने प्रशासनाची धावपळ, 10 जूनपर्यंत योजना पूर्ण करण्याचे आश्वासन
– महत्वाची बातमी ! सोमवारी दुपारी 1 वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल, बोर्डाकडून घोषणा । SSC Result 2024
– पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर प्रशासनाचे कठोर पाऊल ! तब्बल 32 रूफटॉप, पब आणि बार केले सील । Pune News