मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ आयोजित निवासी बाल वारकरी अध्यात्मिक संस्कार शिबिराचा सांगता समारंभ नुकताच संपन्न झाला. कान्हे फाटा येथे हे निवासी बाल वारकरी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सांगता समारंभाला आमदार सुनिल शेळके यांच्या समवेत स्वामी निरंजनानंद सरस्वती, जेष्ठ नेते भास्कर म्हाळसकर, सुकनशेठ बाफना, माऊलीमामा शिंदे, राजाराम शिंदे, मनोहर भेगडे, ज्ञानेश्वर साबळे, हभप दत्तात्रय हजारे, नंदकुमार भसे, संतोष कुंभार, दिलीप महाराज खेंगरे, विकेश मुथा, सुवर्णा कुंभार, नंदा सातकर आणि मान्यवर उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
साई सेवाधाम, कान्हे फाटा येथे हफ्ताभरापासून हे निवासी बालवारकरी संस्कार शिबीर आयोजित करण्यात आले होते. सांगता समारंभाला ह.भ.प. दत्ताञेय महाराज हजारे यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. “मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडाळाने बालसंस्कार शिबिराचा उपक्रम राबविल्याने यापुढे काही गरज वाटल्यास आपण सहकार्य करण्यास तयार आहे. लोकांनी निवडून दिल्यामुळे मागेपुढे न पाहता चांगल्या कामाला मदत देईल,’ असे आमदार शेळके म्हणाले. ( Maval Taluka Warkari Sampradaya Mandal organized Nivasi Bal Warkari Adhyatmik Sanskar Shibir Kanhe )
“भगवान श्रीकृष्णाने सर्व बालगोपाळ एकत्र करून मथुरेत जाणारे दूध, दही, लोणी यांचे माठ गवळणींना वाटेतच अडवून फोडले. विटी दांडू, हमामा, लगोरी, चेंडू फळी आदी खेळ खेळले. भूक लागल्याने सर्वांचेसमोर एकञ शिदोरी करून गोपाळांना खाऊ घातली. उत्तम काला रूपी रस चवीचवीने ब्रम्हरस आवडीने सेवावयास सांगितले. भगवंताने सर्व सवंगड्यांबरोबर हरिनामाचा खिचडी काला केला,” असे ह. भ. प. दत्ताञेय महाराज हजारे यांनी कीर्तनात सांगितले.
परमहंस निरजानंद सरस्वती महाराज यांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल कौतूक केले. “मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाने आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबीरात संत तुकाराम महाराज, महात्मा गांधी आणि भगवान महावीर निर्माण होतील. आपको रामजी, कृष्णजी निर्माण होना चाहिए तो पहले महिलाए कौसल्या, यशोदा व्हायला हव्या. छञपती शिवाजी महाराज हवे असेल तर राष्ट्रमाता जिजाऊ आधी तयार व्हायला हवेत.’ असे ते म्हणाले.
अधिक वाचा –
– अपेक्षित हुंडा न मिळाल्याने सासरच्यांनी केला छळ, त्रासाला कंटाळून नवविवाहितेची आत्म’हत्या, मावळमधील धक्कादायक प्रकार!
– गाव करी ते राव काय करी ! कुसगाव ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पवित्र्याने प्रशासनाची धावपळ, 10 जूनपर्यंत योजना पूर्ण करण्याचे आश्वासन
– महत्वाची बातमी ! सोमवारी दुपारी 1 वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल, बोर्डाकडून घोषणा । SSC Result 2024