व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोडजवळ झालेल्या ‘त्या’ अपघातात कार चालक आणि प्रवाशाला गमवावे लागले पाय !

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथून निगडीकडे येणाऱ्या मार्गावर जकात नाक्याजवळ एका टेम्पोने कारला धडक दिली. 23 मे रोजी हा अपघात घडला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 28, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
car and tempo accident near dehu road on old pune mumbai highway

Photo Courtesy : Team Dainik Maval


जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथून निगडीकडे येणाऱ्या मार्गावर जकात नाक्याजवळ एका टेम्पोने कारला धडक दिली. 23 मे रोजी हा अपघात घडला होता. या अपघातात कारसह टेम्पो संरक्षक कठडा तोडून रस्त्याच्या खाली पडले होते. या भीषण अपघातात कार चालकाला त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले आहेत, तर कारमधील प्रवाशाला एक पाय गमवावा लागला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

कार चालक ज्ञानेश्वर नारायण पाटील (वय 35, रा. वडगाव मावळ, पुणे. मूळ रा. टिटवी, ता. पारोळा, जि. जळगाव) यांचे दोन्ही पाय आणि कार मधील प्रवासी ओमकार प्रकाश जोशी (वय 29) यांचा डावा पाय कापण्यात आला आहे. याप्रकरणी नारायण शामराव पाटील (वय 65) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा ज्ञानेश्वर पाटील हे प्रवासी कार चालवत होते. ते 23 मे रोजी सकाळी प्रवासी घेऊन निगडीच्या दिशेने जात होते. जकात नाक्याजवळ आल्यानंतर त्यांच्या कारला पाठीमागून भरधाव आलेल्या टेम्पोने (एमएच 14/टीसी 179) जोरात धडक दिली. यामध्ये कार रस्त्याच्या बाजूला असलेला लोखंडी संरक्षक कठडा तोडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्ड्यात पडली. तसेच टेम्पो देखील खड्ड्यात पडला.

अपघातात कार चालक ज्ञानेश्वर, कार मधील प्रवासी आणि टेम्पो चालक असे तिघे जखमी झाले. दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. ज्ञानेश्वर यांचे दोन्ही तर प्रवासी ओमकार जोशी यांचा डावा पाय कापावा लागला. दोन्ही वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत. ( car and tempo accident near dehu road on old pune mumbai highway car driver passenger legs were cut off )

अधिक वाचा –
– तळेगावातील सरस्वती विद्या मंदिर शाळेचा 100 टक्के निकाल; 19 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण । SSC Result 2024
– मोठी बातमी ! दहावीचा निकाल जाहीर, संपूर्ण राज्याचा निकाल 95.81 टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, वाचा निकालाची ठळक वैशिष्ट्ये
– पार्क केलेल्या कारची काच फोडून गाडीतील लॅपटॉप, फोन आणि रोकड केली लंपास, तळेगाव पोलिसांत गुन्हा दाखल

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात पंजाब राज्यातील तरूणाचा बुडून मृत्यू; गुगलवर मॅप पाहून पर्यटनासाठी आले आणि…

Next Post

मावळात मुलांपेक्षा मुलीच हुशार ! दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात मुलींनीच मारली बाजी । SSC Result Maval Taluka

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
SSC-HSC-Exam-Result

मावळात मुलांपेक्षा मुलीच हुशार ! दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात मुलींनीच मारली बाजी । SSC Result Maval Taluka

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.