व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मळवंडी ठुले येथे खरीप हंगाम शेतकरी सभा संपन्न; शेतकऱ्यांना गादीवाफा रोपवाटिका, चारसूत्री भातलागवड, बिजप्रक्रियेबाबत मार्गदर्शन

मळवंडी ठुले येथे कृषि विभागामार्फत शेतकऱ्यासाठी खरीप हंगाम सभा घेण्यात आली. सभेमध्ये शेतकऱ्यांना कृषिसहाय्यक विकास गोसावी यांनी घरगुती भात बियाण्यास 3 टक्के मिठाच्या द्रावणाची बिजप्रक्रिया समजावून सांगितली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 29, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
Kharif Season Farmers Meeting

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवनानगर (प्रतिनिधी : धर्मेंद्र ठाकर) खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांच्या शेतावर मशागतीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मावळ तालुका कृषी विभाग व मंडळ कृषी अधिकारी कार्यालय काळेकॉलनीच्या वतीने पवनमावळ भागात गावोगावी भात पिक पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करणे व रोपवाटिका गादी वाफ्यावर तयार करणे, चारसूत्री लागवड, फळबाग लागवड संदर्भात मोहीम राबविली जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मळवंडी ठुले येथे कृषि विभागामार्फत शेतकऱ्यासाठी खरीप हंगाम सभा घेण्यात आली. सभेमध्ये शेतकऱ्यांना कृषिसहाय्यक विकास गोसावी यांनी घरगुती भात बियाण्यास 3 टक्के मिठाच्या द्रावणाची बिजप्रक्रिया, रासायनिक जैविक बिजप्रक्रिया, चारसूत्री लागवड, मग्रारोहयो फळबाग लागवड, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, कृषि यांत्रिकीकरण महाडिबीटी प्रणाली वर अर्ज करणे, कृषि विभागाच्या योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ( Kharif Season Farmers Meeting concluded at Malwandi Thule Maval Taluka )

गादीवाफा रोपवाटिका करताना –
गादी वाफे तयार करताना तळाशी 4 फूट व वाफ्यावर 3 फूट रुंदीचे आणि 8 ते 10 से. मी उंचीचे व क्षेत्रानुसार लांबीचे बनवावेत. एक एकर भात लागवडीसाठी चार गुंठ्याची रोपवाटिका पुरेशी होते. भाताच्या तुसाची राख रोपवाटिका तयार करताना मातीत मिसळली तर रोपाना सिलिकॉन उपयुक्त अन्नद्रव्य मिळते व रोपे निरोगी जोमदार येतात. गादी वाफा एक गुंठा क्षेत्रासाठी एक किलो युरिया,3 किलो सिंगल सुपर फॉसफेट, 85 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सुफला 15:15:15 ही खताची मात्रा द्यावी.रोपवाटिका तण नियंत्रण करणे साठी गादी वाफे पावसाने ओले झाल्यावर व बियाणे उगवण्यापुर्वी “गोल ” या तणनाशकाची एक मिली एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोपे 21 दिवस वयाची झाली की पुनरलागवड करावी असे कृषी सहाय्यक विकास गोसावी यांनी सांगितले

मळवंडी येथे शेतकरी सभेस प्रगतशील शेतकरी प्रदीप देशपांडे, अनंता बेनगुडे,किसन ठुले,अप्पा आमले, गणेश तोंडे, वसंत पवार, भाऊ तोंडे, दत्ता तोंडे, रोहिदास ठुले, बाळू ठुले, बाबजी सुतार, सुरेश शिंदे, सुभाष तोंडे, बाबुराव उदेकर, बाळू पवार, मारुती उदेकर,योगेश राक्षे,मधू ठुले,अंकुश ठुले, हरिभाऊ ठुले,प्रथमेश देशपांडे, ज्ञानेश्वर ठुले, रामदास शिंदे,रामदास ठुले उपस्थित होते

गादीवाफा रोपवाटिका फायदे :
– रोपवाटिकेत तण नियंत्रण व आंतरमशागत करणे सोपे जाते.
– जमिनीच्या वर वाफ्याला उंची असल्यामुळे रोपांच्या मुळाजवळ हवा खेळती राहते त्यामुळे रोपांची वाढ चांगली होते.
– पाण्याची पातळी समप्रमाणात राहते त्यामुळे रोपे तजेलदार व जोमदारपणे वाढतात.
– रोपवाटिकेत खत व्यवस्थापन व किड रोग नियंत्रण करणे सोपे जाते.
– रोपांच्या पुनर्र लागवडीसाठी गादी वाफ्यावरून रोपे सहज काढता येतात.
विकास गोसावी (कृषि सहाय्यक, शिळींब)

अधिक वाचा –
– मावळात 4 जून पूर्वीच उधळला गुलाल ! पाटण गावच्या सरपंचपदी ‘यांची’ बिनविरोध निवड । Maval News
– मावळात मुलांपेक्षा मुलीच हुशार ! दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात मुलींनीच मारली बाजी । SSC Result Maval Taluka
– जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोडजवळ झालेल्या ‘त्या’ अपघातात कार चालक आणि प्रवाशाला गमवावे लागले पाय !


dainik maval jahirat

Previous Post

पुणे अपघाताची पुनरावृत्ती नको ! लोणावळ्यात रात्री उशीरा रस्त्यांवर फिरणाऱ्या नशेबाजांवर कारवाईची मागणी । Lonavala News

Next Post

अल्पवयीन मुलीने देहविक्री करण्यास नकार दिल्याने तिच्यावर धारदार शस्त्राने वार, मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार ! Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Women-Crime

अल्पवयीन मुलीने देहविक्री करण्यास नकार दिल्याने तिच्यावर धारदार शस्त्राने वार, मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार ! Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.