व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून खालापूरमध्ये मॉकड्रिल संपन्न । Raigad News

गेल्या काही दिवसात रसायनी, पातळगंगा, डोंबिवली, महाड इत्यादी ठिकाणी घडलेल्या अग्निप्रलय आणि वायूगळतीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील यंत्रणा किती सतर्क आहेत याचा आढावा घेण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 30, 2024
in महाराष्ट्र
Mock drill completed in Khalapur

Photo Courtesy : Gurunath Sathilkar


रायगड जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी रायगड यांच्या आदेशान्वये मंगळवारी (दिनांक 28 मे) रोजी रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायत हद्दीतल्या टाटा स्टील कंपनीमध्ये वायू गळती झाल्याची खबर दिली गेली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आपत्ती व्यवस्थापनाकडून ही माहिती मिळता क्षणीच खालापूर तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तहसीलदार आयुब तांबोळी, निवासी तहसीलदार सुधाकर राठोड, खालापूर तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी तात्काळ सर्व यंत्रणांना वायुगळती झालेल्या ठिकाणी रवाना होण्याचे आदेश दिले. ( Mock drill completed in Khalapur by Raigad District Disaster Management )

त्यानुसार खालापूर तालुका पोलीस ठाण्याची यंत्रणा, खालापूर तालुका महसूल विभागाचे विविध अधिकारी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, टाटा स्टील कंपनीचे अग्निशमन दल आणि सुरक्षा कर्मचारी तसेच अन्य संस्थांचे पदाधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले. रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी एम के म्हात्रे यांनी तात्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व यंत्रणाचे कौतुक केले आणि अशाच पद्धतीने कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी सतर्क राहण्याचे आदेश दिले.

गेल्या काही दिवसात रसायनी, पातळगंगा, डोंबिवली, महाड इत्यादी ठिकाणी घडलेल्या अग्निप्रलय आणि वायूगळतीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील यंत्रणा किती सतर्क आहेत याचा आढावा आणि अंदाज घेण्याचे दृष्टिकोनातून मॉकड्रीलचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एम के म्हात्रे यांनी दिली.

अधिक वाचा –
– सर्वांनाच आतुरता निकालाची ! 2 वाजेपर्यंत समजणार मावळचा नवा खासदार, किती फेऱ्या होणार? कशी आहे व्यवस्था? वाचा सविस्तर
– महत्वाची बातमी ! तळेगावकरांची होणार गैरसोय, गुरुवारी ‘या’ ठिकाणचा पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या । Talegaon Dabhade
– अल्पवयीन मुलीने देहविक्री करण्यास नकार दिल्याने तिच्यावर धारदार शस्त्राने वार, मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार ! Maval News


Previous Post

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी केंद्रावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून ‘प्रवीण ढमाले’ यांची नियुक्ती । Maval Lok Sabha

Next Post

प्रतिक्षा संपली… पुणे रिंगरोड बाबत अत्यंत महत्वाची अपडेट, लगेच वाचा । Pune Ring Road Update

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune-Ring-Road

प्रतिक्षा संपली... पुणे रिंगरोड बाबत अत्यंत महत्वाची अपडेट, लगेच वाचा । Pune Ring Road Update

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.