पिंपरी – चिंचवड शहरासाठी वरदान असलेले आणि पवन मावळ विभागातील हजारो नागरिकांसाठी पाण्याचा प्रमुख स्त्रोत असलेले पवना धरण आता आटू लागले आहे. इतकेच नाही तर 31 मे उलटून गेल्यानंतर धरणातील पाणी तळ गाठू लागले आहे. पवना धरणात आजमितीला अवघा 23.90 टक्के इतका पाणीसाठा असल्याची माहिती पवना धरण अभियंता यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कडक उन्हाने पाण्याचे चांगलेच बाष्पिभवन होऊन पाणी वेगाने कमी होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 2 टक्के कमी पाणीसाठा आहे. मान्सूनची चाहूल लागली असून कदाचित 8 ते 9 तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. तसेच आता धरणात असलेले पाणी योग्य नियोजनाने जुलै 2024 अखेरपर्यंत पुरू शकेल, असे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र पावसाने ओढ दिल्यास पिंपरी चिंचवड शहरवासियांवर पाणीटंचाईचे संकटही ओढावू शकते, हे नाकारता येणार नाही. ( 23 percent water storage in Pavana Dharan Pavana Dam Updates June 2024 )
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा –
पिंपरी चिंचवड शहरासाठी महापालिका पवना धरणातून दररोज 520 एमएलडी पाणी घेते. हे पाणी पवना नदीवरील रावेत बंधारा येथून अशुद्ध जलउपसा केंद्रात उचलले जाते. तेथून ते निगडी येथील सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून ते संपूर्ण शहरात पुरविले जाते.
गेल्या काही दिवसापांसून आंद्रातून होणारा अपुरा पाणी पुरवठा आता सुरळीत झाला असून महापालिका 80 एमएलडी पाणी इंद्रायणी नदीवरील निघोजे येथील बंधाऱ्यातून उचलते. हे पाणी चिखली जलशुद्धीकरण आणले जाते. तेथे पाणी शुद्ध करून चिखली, मोशी, चऱ्होली, भोसरी परिसरातील नागरिकांना दिले जात आहे. एमआयडीसीकडून महापालिका सध्या 15 एमएलडी पाणी असे एकूण 615 एमएलडी पाणी शहराला दिले जात आहे.
अधिक वाचा –
– विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट ! स्वाधार योजनेच्या अर्जाची प्रत महाविद्यालयात जमा करण्याचे आवाहन । Swadhar Yojana
– मावळ खरेदी-विक्री संघ होणार मजबूत ! पदाधिकाऱ्यांचा बारामती अभ्यास दौरा पूर्ण, नवीन प्रकल्पांतून संघाचा होणार कायापालट
– तब्बल 206 प्रचारसभा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यानधारणा सुरू । Prime Minister Narendra Modi Meditation