व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना धरणात 23.90 टक्के पाणीसाठा, कधीपर्यंत पुरेल हे पाणी? वाचा अधिक । Pavana Dam Updates

पिंपरी - चिंचवड शहरासाठी वरदान असलेले आणि पवन मावळ विभागातील हजारो नागरिकांसाठी पाण्याचा प्रमुख स्त्रोत असलेले पवना धरण आता आटू लागले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 1, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
Pavana-Dam-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


पिंपरी – चिंचवड शहरासाठी वरदान असलेले आणि पवन मावळ विभागातील हजारो नागरिकांसाठी पाण्याचा प्रमुख स्त्रोत असलेले पवना धरण आता आटू लागले आहे. इतकेच नाही तर 31 मे उलटून गेल्यानंतर धरणातील पाणी तळ गाठू लागले आहे. पवना धरणात आजमितीला अवघा 23.90 टक्के इतका पाणीसाठा असल्याची माहिती पवना धरण अभियंता यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कडक उन्हाने पाण्याचे चांगलेच बाष्पिभवन होऊन पाणी वेगाने कमी होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 2 टक्के कमी पाणीसाठा आहे. मान्सूनची चाहूल लागली असून कदाचित 8 ते 9 तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. तसेच आता धरणात असलेले पाणी योग्य नियोजनाने जुलै 2024 अखेरपर्यंत पुरू शकेल, असे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र पावसाने ओढ दिल्यास पिंपरी चिंचवड शहरवासियांवर पाणीटंचाईचे संकटही ओढावू शकते, हे नाकारता येणार नाही. ( 23 percent water storage in Pavana Dharan Pavana Dam Updates June 2024 )

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा –
पिंपरी चिंचवड शहरासाठी महापालिका पवना धरणातून दररोज 520 एमएलडी पाणी घेते. हे पाणी पवना नदीवरील रावेत बंधारा येथून अशुद्ध जलउपसा केंद्रात उचलले जाते. तेथून ते निगडी येथील सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून ते संपूर्ण शहरात पुरविले जाते.

गेल्या काही दिवसापांसून आंद्रातून होणारा अपुरा पाणी पुरवठा आता सुरळीत झाला असून महापालिका 80 एमएलडी पाणी इंद्रायणी नदीवरील निघोजे येथील बंधाऱ्यातून उचलते. हे पाणी चिखली जलशुद्धीकरण आणले जाते. तेथे पाणी शुद्ध करून चिखली, मोशी, चऱ्होली, भोसरी परिसरातील नागरिकांना दिले जात आहे. एमआयडीसीकडून महापालिका सध्या 15 एमएलडी पाणी असे एकूण 615 एमएलडी पाणी शहराला दिले जात आहे.

अधिक वाचा –
– विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट ! स्वाधार योजनेच्या अर्जाची प्रत महाविद्यालयात जमा करण्याचे आवाहन । Swadhar Yojana
– मावळ खरेदी-विक्री संघ होणार मजबूत ! पदाधिकाऱ्यांचा बारामती अभ्यास दौरा पूर्ण, नवीन प्रकल्पांतून संघाचा होणार कायापालट
– तब्बल 206 प्रचारसभा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यानधारणा सुरू । Prime Minister Narendra Modi Meditation


Previous Post

महत्वाची बातमी ! नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार

Next Post

महिलेचा विनयभंग करुन फरार झालेल्या ओला कॅब चालकाच्या मुसक्या आवळण्यात देहूरोड पोलिसांना यश । Dehu Road Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dehu-Road-Police-Station

महिलेचा विनयभंग करुन फरार झालेल्या ओला कॅब चालकाच्या मुसक्या आवळण्यात देहूरोड पोलिसांना यश । Dehu Road Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.