Maval Lok Sabha Constituency Exit poll estimates : लोकसभेसाठी सातव्या अर्थात अंतिम टप्प्यातील मतदान पार पडताच एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. देशात पुन्हा नरेंद्र मोदी यांचीच सत्ता येणार असे एक्झिट पोलचे आकडे सांगत असून महाराष्ट्रात महाविकासआघाडी आणि महायुती यांच्यात जोरदार रस्सीखेच होत असल्याचे दिसून येत आहे. महत्वाचे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा ज्या मतदारसंघात पणाला लागली आहे, असे शिवसेनेच्या दोन गटात लढत होत असलेल्या मतदारसंघांबाबतही एक्झिटपोल मध्ये अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्यानुसार मावळ लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांचाच विजय होताना दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा तिकीट देण्यात आले आणि बारणे आपल्या हॅटट्रीकसाठी मैदानात उतरले. तर बारणेंना रोखण्यासाठी आणि मावळ मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाकडून संजोग वाघेरे यांना रिंगणात उतरवले. सुरुवातीपासूनच मावळ लोकसभेची निवडणूक चुरशीची झाली. त्यामुळे निकाल काय लागेल, याची सर्वांनाच उत्सूकता आहे. परंतू एक्झिट पोलच्या अंदाजानुसार बारणे आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. ( Maval Lok Sabha Constituency Exit poll estimates Shrirang Barane in the lead Sanjog Waghere is behind )
बारणेंसाठी जमेच्या बाजू –
मावळ लोकसभा मतदार संघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ तर रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सहाही ठिकाणी सध्या महायुतीचे अर्थात बारणे ज्या आघाडीकडून उमेदवार म्हणून आहेत, त्याच महायुतीचे सर्व ठिकाणी आमदार आहेत.
चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर हे दोघे भाजपचे आमदार, उरणचे अपक्ष आमदार महेश बाल्दी यांचाही भाजपला पाठिंबा म्हणजेच बारणेंना पाठींबा. तर, मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनिल शेळके, पिंपरीमध्ये दादा गटाचेच अण्णा बनसोडे हे दोन आमदार आहेत. आणि कर्जत मतदारसंघातील महेंद्र थोरवे हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघावर महायुतीचे वर्चस्व आहे. ही गोष्ट बारणेंना लाभदायक ठरल्याचे दिसत आहे.
अधिक वाचा –
– पवना धरणात 23.90 टक्के पाणीसाठा, कधीपर्यंत पुरेल हे पाणी? वाचा अधिक । Pavana Dam Updates
– महत्वाची बातमी ! नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार
– मान्सून तोंडावर… मावळ तालुक्यात शेतीच्या मशागतीची कामे वेगात, पेरणीची कामे अंतिम टप्प्यात !