शेतकऱ्यांकडून सध्या शेतीच्या मशागतीच्या कामांची लगबग सुरु असून पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आल्याचे दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्यांसाठी आवश्यक रासायनिक खते आणि बी-बियाणे उपलब्ध व्हावेत या उद्देशाने कृषी विभागाकडून सर्व खते व बियाणे विक्रेत्यांकडे पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
असे असतानाही काही विक्रेते हे खते व बियाणांची जास्त दराने विक्री करण्याचा प्रयत्न करतात. तसेच जाणीवपूर्वक कृत्रीम टंचाई निर्माण झाल्याचा भास निर्माण करतात. अशा खते व बियाणे विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आता जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने 14 भरारी पथके स्थापनांची स्थापना करण्यात आली आहे. ( Setting up of 14 squads to monitor fertilizer and seed sellers Pune News )
या भरारी पथकांच्या माध्यमातून खते व बियाणे विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच जाणीवपूर्वक खते व बियाणांची टंचाई निर्माण झाल्याचा भास करून निश्चित केलेल्या किमतीपेक्षा जास्त भावाने शेतकऱ्यांना खते व बियाणांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
पुणे जिल्ह्यात हवेली, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे, खेड, जुन्नर आणि आंबेगाव हे आठ तालुके खरीप तालुके म्हणून ओळखले जातात. या आठ तालुक्यांमध्ये एकूण 1 हजार ३८० गावे ही खरीपाची गावे आहेत. तसेच पुणे जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र (उसासह) 3 लाख 62 हजार हेक्टर एवढे आहे. त्यापैकी खरीप पिकांसाठी 1 लाख 95 हजार हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे.
अधिक वाचा –
– मावळात पुन्हा बारणेच ? एक्झिट पोलच्या निकालाने महाविकासआघाडीच्या गोटात शांतता, शिंदे-ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला । Maval Lok Sabha Constituency
– मावळमध्ये ‘हिट अँड रन’चा प्रकार ! तळेगावच्या मुख्याधिकाऱ्यांची दोन वाहनांना धडक, बेजबाबदारपणे घटनास्थळावरून पळाले
– कित्येक वर्षांची प्रतीक्षा संपली… वडगाव शहरातील 42 आदिवासी कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप । Vadgaon Maval