व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी कारवाई ! खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या आरोपींना गजाआड करण्यात देहूरोड पोलिसांना यश । Pune Crime

अटक आरोपीच्या साथीदाराचा शोध घेण्यासाठी देहूरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी एक पथक तयार केले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 3, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Dehu-Road-Police-Station

File Image - Dehu Road Police Station


देहुरोड पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक 279/2024 भा.द.वि. कलम 307, 324, 504, 506, 34 आर्म अॅक्ट 4 (25) (27) प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्ह्यातील आरोपी दीपक दत्तात्रय शेलार (वय 33 वर्षे रा. देहूगांव) याला अटक केली होती, परंतू त्याचे साथीदार फरार होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

अटक आरोपीच्या साथीदाराचा शोध घेण्यासाठी देहूरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी एक पथक तयार केले होते. या पथकाने केलेल्या तपासात फरार आरोपी हे अंबरनाथ, कल्याण, ठाणे, घाटकोपर, मुंबई पुणे अशा ठिकाणी सतत ठिकाण बदलून लपून राहत होते, असे समजले. त्यामुळे त्यांना पकडणे तसे मुश्कील होते. ( Dehu Road Police arrested accused who absconded with attempted murder )

परंतू हे आरोपी देहूगाव भागात आले असता पोलिसांनी योग्य पाऊल उचलले, आणि पथकाने अथक प्रयत्नांतून या आरोपींना देहूगांव येथील विठ्ठलवाडीच्या डोंगराळ भागातून ताब्यात घेऊन अटक केली. यात आरोपी कुंदन संदिप थोरात (वय 25 वर्षे), अनिकेत संतोष विटकर (वय 19 वर्षे), रोहन दुंदा चिमटे (वय 21 वर्षे) तिघेरी राहणार देहुगांव (ता. हवेली) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन दाखल गुन्ह्यात अटक केली. आरोपींना कोर्टाने 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिली असून देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्‍त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्‍त परिमंडळ-2 बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पोलीस अंमलदार सुनिल यादव, किशोर परदेशी, प्रशांत पवार, बाळासाहेब विधाते, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडीक, निलेश जाधव, मोहसिन आत्तार, युवराज माने, शुभम बावनकर, स्वप्नील साबळे यांनी केली.

अधिक वाचा –
– धामणे गावात घरफोडी, पाऊणे नऊ लाखाचा मुद्देमाल लंपास । Maval Crime
– मावळात पुन्हा बारणेच ? एक्झिट पोलच्या निकालाने महाविकासआघाडीच्या गोटात शांतता, शिंदे-ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला । Maval Lok Sabha Constituency
– मावळमध्ये ‘हिट अँड रन’चा प्रकार ! तळेगावच्या मुख्याधिकाऱ्यांची दोन वाहनांना धडक, बेजबाबदारपणे घटनास्थळावरून पळाले


dainik maval jahirat

Previous Post

सावधान ! खते आणि बियाणांची चढ्या दराने विक्री केल्यास खैर नाही, प्रशासनाकडून कारवाईसाठी 14 भरारी पथकांची स्थापना

Next Post

बालेवाडी येथे मतमोजणी ! निकालासाठी जाणारे कार्यकर्ते आणि सामान्यांसाठी महत्वाची अपडेट, वाहतूक मार्गात मोठा बदल, जाणून घ्या

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune-Traffic

बालेवाडी येथे मतमोजणी ! निकालासाठी जाणारे कार्यकर्ते आणि सामान्यांसाठी महत्वाची अपडेट, वाहतूक मार्गात मोठा बदल, जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.