प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या कार्यकाळासाठीच्या मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 30 केंद्रीय मंत्री, 5 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व 20 राज्यमंत्री यांना खातेवाटप जाहीर झाले आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला दोन केंद्रीय मंत्री, एक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व तीन राज्यमंत्री अशी जबाबदारी मिळाली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महाराष्ट्रातून भाजपाचे वरीष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री पदाचा कार्यभार जैसा थे ठेवण्यात आला आहे. तर पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातील राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ( PM Narendra Modi Government 2024 Maharashtra has 2 Cabinets 4 Ministers of State )
आरपीआयचे नेते रामदास आठवले यांची सलग तिसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यांच्याकडे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आलाय. तर, रक्षा खडसे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री पदाचा कार्यभार आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
अधिक वाचा –
– ‘राज्यात आमचे 105 आमदार तरीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री’, प्रवीण दरेकरांनी श्रीरंग बारणेंना शेलक्या शब्दात सुनावले । Pravin Darekar criticizes MP Shrirang Barne
– घरातील कोंबडी न सांगता विकली म्हणून पत्नीने केली बडबड, पतीची आत्म’हत्या; मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार
– मावळमधील विसापूर गडावरील शिवमंदिराचा आठवा जीर्णोद्धार वर्धापनदिन उत्साहात साजरा । Visapur Fort