भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभरात 65 हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. यानुषंगाने मावळ भाजपचे नेते रविंद्र भेगडे यांनी मावळ प्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून नवलाख उंब्रे येथील स्वयंभू प्रभू श्रीराम मंदिर येथे 51 फळ झाडांची लागवड केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
डी.वाय.पाटील कृषी महाविद्यालयातील एन.एन.एस. कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी देखील श्रमदान करून वृक्षलागवड करण्यास आवश्यक असणारे खोदकाम व पाणी टाकण्याचे कार्य करून हातभार लावला. येणाऱ्या काळात देखील मावळ विधानसभा मतदार संघात मावळ प्रभोधिनी संस्थेच्या माध्यमातून इंद्रायणी नदी स्वच्छता, वृक्षारोपण , गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार असल्याचे माहिती मावळ प्रबोधिनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी दिली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संग्राम कदम, चंद्रकांत शिनगारे, रोहिदास दहतोंडे, महेंद्र कडलग, निखिल शेटे, अल्पेश धायभर, डी. वाय.पाटील कॉलेजचे किरण गोसावी, नवलकर मॅडम, काळोखे सर आणि एन.एन.एस. कॅम्प मध्ये सहभागी झालेले विद्यार्थी उपस्थित होते. ( Plantation of trees near Ram Temple in Navlak Umbre through Maval Prabodhini Sanstha )
अधिक वाचा –
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई ! अमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक, साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त । Lonavala Crime
– संस्थेच्या शाळांमधील फी कमी करण्यासंदर्भात बाळा भेगडे यांना पालकांचे निवेदन । Maval News
– सरकारी दवाखान्यात प्रत्येक आजारावर मोफत उपचार, जन आरोग्य योजनेचा अवकाश वाढणार, शिंदे सरकारचा मेगा प्लॅन