देशात सध्या केशरी आणि पिवळे रेशन कार्ड धारकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळत आहे. सरकारने आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांची सांगड घालून ती एकत्रितपणे राज्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार आयुष्मान योजनेच्या लाभार्थी घटकामध्ये पांढऱ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांनाही आता आरोग्य योजनांचे आयुष्मान कार्ड काढता येणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शासनाच्या केशरी, पिवळे रेशनकार्ड धारकांना आयुष्मान भारत योजनेच्या कार्डचा लाभ यापूर्वी मिळत होता. मात्र पांढरे रेशनकार्ड धारक हे या योजनेपासून वंचित होते. शासनाच्या आरोग्य विभागाने या निर्णयात बदल करून पांढरे रेशन कार्ड धारकांना देखील या योजनेचा लाभ देण्याचे शासकीय परिपत्रक काढले होते. त्यामुळे पांढऱ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता व आयुष्यमान कार्ड मिळवल्यासाठी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिका या आधार कार्डशी लिंक करणे महत्वाचे ठरणार आहे. ( White Ration Card Holders Will Get Free Treatment Up To 5 Lakhs In Mahatma Phule Jan Arogya Yoajna & Ayushman Bharat )
आधार कार्ड व रेशन कार्ड लिंक असेल तरच त्यांना या त्या दृष्टीने पांढरी शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची मोहीम राबवावी तसेच पांढरे रेशनकार्ड धारकांनी सुद्धा पुढाकार घेऊन त्यांचे रेशन कार्ड आधारशी लिंक करावे असे आवाहन या अन्न, नागरी व पुरवठा संरक्षंण विभागाने केले आहे.
केंद्र सरकारकडून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ राबविली जात आहे. या योजनेतून लाभार्थ्याला पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. योजनेचा केसरी, पिवळ्या रेशनकार्ड धारकांबरोबरच आता पांढरे रेशनकार्ड असणाऱ्यांनाही लाभ मिळणार आहे. यामध्ये शासकीय नोकरदार असले तरीही ते आयुष्मान कार्डच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेऊ शकतात.
महाराष्ट्रात 1 हजार 350 रुग्णालयांमध्ये आयुष्मान कार्डधारकांना 100 टक्के मोफत उपचार मिळणार आहेत. काही रुग्णालयांच्या अडचणी असून त्यांना देण्यात येणाऱ्या पॅकेजची रक्कम पाच वर्षांत वाढविली नाही. यामध्ये वाढ करण्यासह योजनेचा अभ्यास करण्यासाठी 102 डॉक्टरांनाही राज्यात समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती सखोल अभ्यास करून या योजनेतील त्रुटी दूर करणार आहे.
अधिक वाचा –
– खंडाळा एक्झिट ते वलवण एक्झिट दरम्यान सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– एआय (AI) तंत्रज्ञानाद्वारे मावळमध्ये 70 वर्षीय आजोबांचा कर्करोग झाला बरा ! तळेगाव येथे राज्यातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया
– पंढरीची वारी ठरणार ‘आरोग्यवारी’ ! पालखी मार्गावर मिळणार आरोग्य विषयक सेवा-सुविधा, वाचा सविस्तर