व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लक्ष्मण हाकेंची तब्येत खालावली, डॉक्टरांकडून त्वरित उपचाराचा सल्ला ; ‘हाकेंचे आंदोलन सरकार पुरस्कृत’, मनोज जरांगेंची टीका

महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत थंड झालेल्या आरक्षणाच्या मागणीने आचारसंहिता संपताच पुन्हा एकदा जोर धरला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 19, 2024
in महाराष्ट्र, देश-विदेश, मावळकट्टा
Manoj Jarange Patil and Laxman Hake

Photo Courtesy : Team Dainik Maval


महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत थंड झालेल्या आरक्षणाच्या मागणीने आचारसंहिता संपताच पुन्हा एकदा जोर धरला आहे. महत्वाचे म्हणजे यावेळी फक्त मराठा समाज नाही तर ओबीसी समाज देखील आरक्षणाबाबत काही मागण्या घेऊन रस्त्यावर उतरला आहे. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके हे मागील अनेक दिवसांपासून आरक्षणाबाबतच्या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. लक्ष्मण हाकेंच्या या आंदोलनावर आता मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे. ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

हाकेंची प्रकृती खालावली –
लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ उपोषण सुरू केले आहे. आज (दि. 19) उपोषणाचा सातवा दिवस आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून हाके यांची प्रकृती खालावत चालली आहे. आता त्यांचा रक्तदाब वाढला असून त्यांना हृदयविकाराचा धोका संभवतो, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली. लक्ष्मण हाके यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधत ही माहिती दिली.

‘हाकेंच्या आज उपोषणाचा सातवा दिवस आहे. तीन-चार दिवसांपासून त्यांचा रक्तदाब वाढत आहे. कालपेक्षा आज रक्तदान वाढला आहे. पल्स 98 असून ऑक्सिजन लेव्हल 98 आहे, ब्लड शुगर 81 वर आली आहे. त्यामुळे त्यांच्या हृदयावर दबाव येऊ शकतो. त्यांना त्वरीत रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करणे गरजेचे आहे. कार्डिओलॉजिस्टचा सल्ला घेणे गरजेचे आहे’, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

ओबीसींचे आंदोलन सरकार पुरस्कृत –
दुसरीकडे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मात्र लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर टीका केली आहे. ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. तसेच मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन सोडणार नसल्याचेही जरांगेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ( Maratha protester Manoj Jarange Patil criticizes OBC leader Laxman Hake hunger strike )

‘भारतात लोकशाही आहे, त्यामुळे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांची मागणी ते करतात मी माझ्या समाजावर ठाम आहे. ते दिशाभूल करत आहेत. त्यांना आरक्षण संविधानाने दिले आहे. SC-ST ला धक्का लागणार नाही, त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्याचे आंदोलन सरकार पुरस्कृत आंदोलन आहे. आधीचे आणि आताचे आंदोलन पाहिल्यावर लक्षात येतं. आंदोलनाला एवढे लोक येतात त्यावरुन लक्षात येतं आहे. आंदोलकांना मी काही म्हणत नाही मात्र हे सरकार घडवून आणत आहे.’ अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना जरांगेंनी दिली.

अधिक वाचा –
– एआय (AI) तंत्रज्ञानाद्वारे मावळमध्ये 70 वर्षीय आजोबांचा कर्करोग झाला बरा ! तळेगाव येथे राज्यातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया
– पंढरीची वारी ठरणार ‘आरोग्यवारी’ ! पालखी मार्गावर मिळणार आरोग्य विषयक सेवा-सुविधा, वाचा सविस्तर
– ‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील’ – सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव येथे भीषण अपघात, स्कूल बसला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर दुकानात घुसला, महिला ठार बालके जखमी

Next Post

मोठा निर्णय ! पांढरे रेशनकार्ड धारकांनाही मिळणार महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेचा लाभ

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
White Ration Card Holders

मोठा निर्णय ! पांढरे रेशनकार्ड धारकांनाही मिळणार महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेचा लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
Lonavala residents public outcry against Tata highway blocked demanding compensation for flood damages

टाटा कंपनीविरोधात लोणावळाकरांचा जनआक्रोश, महामार्ग रोखला ; पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आंदोलन

July 29, 2026
Laptops distributed to Assistant Agriculture Officers by Deputy Chief Minister Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप

July 29, 2026
Car overturns into field after road collapses at Kale-Pavananagar no remedial measures taken after accident

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

July 28, 2026
Rice-Cultivated-Maval

Rice Farming in Maval Taluka : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

July 28, 2026
SRT

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

July 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.