इंद्रायणी ही मावळ तालुक्यात उगम पावणारी महत्वाची नदी आहे. इंद्रायणी नदीच्या तीरावर संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवनी समाधी असलेले आळंदी आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची कर्मभूमी असलेले देहू ही दोन महत्त्वाची तीर्थक्षेत्र आहेत. ही दोन्ही तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील लाखो वारकरी बांधवांचे श्रध्दास्थान आहेत, त्यामुळे इंद्रायणी नदीला अनन्य साधारण महत्त्व आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महाराष्ट्रातील लाखो वारकरी श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी देहू आणि आळंदी येथे येत असतात. अशातच इंद्रायणी नदीवर वाढलेली जलपर्णी आणि त्यामुळे होणारे प्रदुषण यामुळे नदी पात्रातील पाणी दूषित झाले असून त्यामुळे साथीचे आजार देखील वाढू शकतात. ( Indrayani river cleaning campaign should be taken up immediately )
त्यामुळे तालुका प्रशासनाने पुढील संभाव्य धोके लक्षात घेऊन तत्काळ इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान हाती घ्यावे, अशी मागणी मावळ भाजपाचे नेते रविंद्र भेगडे यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे केली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत कुसगाव बुद्रुकचे सरपंच ज्ञानेश्वर गुंड उपस्थित होते.
अधिक वाचा –
– खंडाळा एक्झिट ते वलवण एक्झिट दरम्यान सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– मोठा निर्णय ! पांढरे रेशनकार्ड धारकांनाही मिळणार महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेचा लाभ
– वडगाव येथे भीषण अपघात, स्कूल बसला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर दुकानात घुसला, महिला ठार बालके जखमी