व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे रिंगरोड बाबत महत्वाची बातमी ! ‘एमएसआरडीसी’कडून प्रकल्पाबाबत महत्वाची अपडेट समोर । Pune Ring Road

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा मुद्दा कायमचा निकाली काढण्यासाठी 'पुणे रिंग रोड' या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 24, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Pune-Ring-Road

Photo Courtesy : Team Dainik Maval


Pune Ring Road Project Update : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा मुद्दा कायमचा निकाली काढण्यासाठी ‘पुणे रिंग रोड’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) माध्यमातून हा रिंग रोड बांधण्यात येणार असून प्रकल्पासंदर्भात महत्वाची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जुलै अखेरीस पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या 136 किमी लांबीच्या कामासाठी कंत्राटदार अंतिम करणार असून कंत्राटदार अंतिम झाल्यानंतर प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होईल, असे सांगितले जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मागील अनेक दिवसांपासून पुणे रिंग रोड प्रकल्पाचे भूमिपूजन कधी होणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम पावसाळ्यानंतर सुरू होईल, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समोर आली आहे, त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरवासियांकडून व जिल्ह्यातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. ( Important News Regarding Pune Ring Road Project Update From MSRDC )

  • पुणे रिंगरोड प्रकल्पाचे दोन भाग करण्यात आलेत. पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात हे काम पूर्ण होणार आहे. म्हणजे प्रकल्पात ईस्टर्न आणि वेस्टर्न कॉरिडॉरचा समावेश आहे. प्रकल्पासाठी मार्चमध्ये विविध कंपन्यांकडून निविदा सादर झाल्या होत्या. दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बोलींचे मूल्यांकन केले जात असून हा प्रकल्प नऊ पॅकेजमध्ये पुर्ण केला जाणार असल्याचे समजते. तसेच या भागांसाठी पाच कंपन्यांची निवड केली जाणार असून प्रकल्पासाठी 17 जानेवारी रोजी निविदा मागविण्यात आल्या होत्या, तर 1 मार्च ही निविदा सादर करण्याची अंतिम मुदत होती.

पश्चिम रिंग रोडचे काम एकूण पाच पॅकेज मध्ये आणि पूर्व रिंग रोडचे काम एकूण चार पॅकेज मध्ये होणार आहे. प्रकल्पाचे काम यंदाच्या पावसाळ्यानंतर सुरू होईल आणि डिसेंबर 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असे बोलले जात आहे. प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत बोलायचे झाले तर पश्चिम रिंग रोडमधील जवळपास सर्व गावांमध्ये जमीन संपादनाचे काम पूर्ण झाले असून मोजक्याच काही गावातील जमिनीचे संपादन बाकी आहे.

पूर्व भागातील रिंग रोडसाठी देखील जमीन संपादनाच्या कामाला सुरुवात झाली असून हे काम लवकर पूर्ण होईल, अशी आशा आहे. प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी जवळपास 10,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, ज्यामध्ये 87 गावांमधील 1,900 हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे. एकंदरीत पुणे रिंग रोडचे काम पावसाळ्यानंतर सुरू होईल आणि नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले असल्याने नजीकच्या काळात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सुटेल असे दिसते.

अधिक वाचा –
– शिवसेवा प्रतिष्ठान लोणावळा यांच्या मार्फत येळसे गावात वृक्षारोपण आणि वृक्ष दत्तक अभियान
– मोहितेवाडी येथे ‘मनसे’कडून दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान । Maval News
– बांधणी संघटनेची, तयारी विधानसभेची ! मावळ तालुका काँग्रेसकडून नव्या नियुक्त्या जाहीर, महिला तालुकाध्यक्षपदी ‘यांची’ नियुक्ती


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 161 इमारती धोकादायक । Talegaon Dabhade

Next Post

1972 साली धरण झाले, 7 आमदार झाले, मात्र पवना धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागायला 2024 साल उजाडले । Pavana Dam

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
farmers affected by Pavana dam

1972 साली धरण झाले, 7 आमदार झाले, मात्र पवना धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागायला 2024 साल उजाडले । Pavana Dam

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.