लाच स्विकारताना गाव पातळीवर महसूल अधिकारी असलेल्या तलाठी भाऊसाहेबाला रंगेहात ताब्यात घेतल्याची घटना मावळ तालुक्यात घडली आहे. मंगळवारी (दि. 25 जून) सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या पथकाने प्राप्त तक्रारीनंतर सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सातबाऱ्यावर पीक नोंद दुरूस्तीसाठी तलाठी अंकुश रामचंद्र साठे (वय 43) यांनी संबंधित शेतकऱ्याकडे दहा हजारांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने सापळा रचून संबंधित तालाठ्याला कार्ला मंडलाधिकारी कार्यालयात लाच स्विकारताना रंगेहात ताब्यात घेतले. अंकुश साठे हे खांडशी सजा चे तलाठी भाऊसाहेब म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. ( Anti-corruption department arrested Talathi officer red-handed while accepting bribe of 10 thousand in Maval Taluka )
मंगळवारी (दि. 25 जून) सायंकाळी 5 वा 50 मिनिटांनी ही कारवाई झाली. त्यानंतर बुधवारी (दि. 26 जून) मध्यरात्री दीडच्या सुमारास लोणावळा ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी तलाठी अटकेत असून त्याना बुधवारीच (दि.26) न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे समजते. गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर हे करत आहेत. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या धडक कारवाईने महसूल विभागात खळबळ माजली आहे.
अधिक वाचा –
– श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या तैलचित्राचे अनावरण । Khashaba Jadhav
– देहूरोड ते खेडशिवापूर दरम्यान पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन । Pune News
– Chanakya Niti : ‘या’ कारणांमुळे वाढतो पती आणि पत्नीत दुरावा, जाणून घ्या सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र