अधिवेशनापूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मंत्रिगण उपस्थित होते. या कॅबिनेट मिटिंग मध्ये 7 महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात पुणे रिंग रोड पूर्व प्रकल्पासाठी 5 हजार 500 कोटी रुपये कर्ज घेण्यास राज्य सरकारने मंजूरी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मंत्रिमंडळ निर्णय –
1) पतीच्या मृत्यपश्चात महिलांना त्यांच्या मिळकतीवर वारस म्हणून नोंद करण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून वारसा प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी आकारण्यात येणारे 75 हजार रुपयांचे शुल्क कमी करून 10 हजार रुपये करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
2) चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा खनिज प्रतिष्ठान, चंद्रपूर व टाटा न्यास (ट्रस्ट) यांच्या माध्यमातून खाजगी भागीदारी तत्त्वावर चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनच्या माध्यमातून 100 खाटांचे कर्करोग रुग्णालय सुरु करण्यात येत आहे. या फाऊंडेशनला जमीन भाडेपट्टयाच्या करारनाम्यासाठी द्याव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्कातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला.
3) विरार ते अलिबाग या बहुउद्देशीय वाहतूक मार्गीका प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 22 हजार 250 कोटी हुडकोकडून कर्जरुपाने घेण्यास मान्यता देण्यात आली. एकूण 1130 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावयाचे असून एकूण 215.80 हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 1341 कोटी 71 लाख रुपये निधी देण्यात आला आहे.
4) पुणे रिंग रोड पूर्व प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 5 हजार 500 कोटी हुडकोकडून कर्जरुपाने घेण्यास मान्यता देण्यात आली. एकूण 972.07 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावयाचे असून एकूण 535.42 हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 1 हजार 876 कोटी 29 लाख रुपये निधी देण्यात आला आहे. ( Government of Maharashtra Cabinet Decision Pune Ring Road Project Mumbai Metro Project )
5) मुंबई मेट्रो-3 लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या हिश्याची 1163 कोटी एवढी रक्कम एमएमआरडीएला देण्याऐवजी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाची सुधारित किंमत 37 हजार 275 कोटी 50 लाख असून प्रकल्पाचे काम 98 टक्के पूर्ण झाले आहे. याचा सिप्झ ते बीकेसी पहिला टप्पा सप्टेंबर 2024 पर्यंत आणि डिसेंबर 2024 अखेरीपर्यंत पूर्ण प्रकल्प सुरु करण्याचे नियोजन आहे.
6) महालक्ष्मी रेसकोर्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पब्लिक पार्क हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येत असून तो विहित कालावधीत पूर्ण करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. या संदर्भात मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला दिलेल्या भूखंडाच्या भाडेपट्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. यांना यथील एकूण 211 एकर भूखंडापैकी अंदाजे 91 एकर शासकीय भूखंडाच्या भाडेपट्याचे दि. 01 जून. 2023 पासून ते दि. 31 मे. 2053 या 30 वर्षाच्या महत्तम कालावधीसाठी नूतनीकरण करण्यास अटी व शर्तीमह मान्यता देण्यात आली आहे. याद्वारे, मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. यांना यापुवों दण्यात आलल्या 211 एकर भुखंडापैकी अंदाजे 91 एकर भुभाग 30 वर्षाच्या भाडेपट्याने देण्यात आला आहे.
7) मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा-2 मधून 3 हजार 909 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून 310 मिलियन डॉलर्सचे कर्ज घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 10 हजार कि.मी. रस्त्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– ‘साहेब, हा भोंगळ कारभार थांबवा..’ मावळ तालुक्यात विजेचा लपंडाव, युवक काँग्रेसचे महावितरणला निवेदन । Maval News
– 18व्या लोकसभेची स्थापना, ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी, राहुल गांधी विरोधी पक्ष नेता, संसदेने पाहिला दुर्मिळ प्रसंग
– तळेगाव दाभाडे येथे आणखीन एका युवकाला पिस्तूलासह अटक । Talegaon Dabhade