Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla : शुक्रवारी (दि. 28 जून) जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या 339 व्या पालखी सोहळ्याला सुरूवात झाली. शुक्रवारी तीन वाजून पाच मिनिटांनी तुकोबांच्या पालखीने देहूतील मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान केले होते. पहिल्या दिवशी प्रथेनुसार पालखीचा देहूतच इनामदार वाड्यात मुक्काम होता. शनिवारी (दि. 29 जून) विठुरायाच्या दर्शनासाठी आतुरलेला हा वैष्णवांचा मेळा फुलांनी सजविलेला रथासह सकाळी अकराच्या सुमारास इनामदार वाड्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
टाळ-मृदंगाच्या गजरात इनामदार वाड्यातील पहिला मुक्काम पूर्ण केल्यावर संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र देहूतून फुलांच्या वर्षावात भावपूर्ण निरोप घेतला. आपले निस्सीम मुस्लीम भक्त अनगडशाहवली बाबाच्या दर्ग्याला तुकोबांच्या पालखीने भेट दिली. यावेळी दोन्ही धर्मियांमधील एकोपा दिसून आला. ( Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla Enter at Akurdi from Inamdar Wada Dehu )
त्यानंतर शनिमंदिराजवळ विसावा घेवून भारतीय सैन्य दलाला तसेच मार्गावरील ग्रामस्थ, शहरवासीयांना दर्शनाचा लाभ देत तुकोबारायांचा पालखी सोहळा उद्योगनगरी पिंपरी चिंचवड महापालिकेत आला. येथे शहरवासियांनी केलेले स्वागत स्विकारुन आज शनिवारी (दि. 29) सायंकाळी आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात पालखी मुक्कामी विसावली. तुकोबांचा पालखी सोहळा रविवारी (दि. 30 जून) आकुर्डी येथून मार्गस्थ होत मुंबई-पुणे महामार्गाने विद्येचे माहेर घर पुणे येथे मुक्कामासाठी सायंकाळी पोहचेल.
अधिक वाचा –
– मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात ! वॅगनार कारमधील दोन जण जागीच ठार । Accident On Mumbai-Pune Expressway
– तळेगाव शहरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा ; दहावी – बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार । Talegaon Dabhade
– पुणे जिल्ह्यातील 233 अतिसंवेदनशिल गावे ‘संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र’ म्हणून घोषित । Pune News