करूंज (ता. मावळ) येथील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या बोगस कारभाराविरोधात पंचायत समिती कार्यालय मावळ येथे शुक्रवारी (दि. 28) आमरण उपोषण केले. भर पावसाळ्यात नागरिकांनी उचललेल्या या टोकाच्या पाऊलामुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काय आहेत मागण्या ?
1. करूंज ग्रामपंचायतीमधील बोगस जागेच्या चौकशी करून बोगस नोंदी रद्द करा.
2. मरिमाता मंदीराकडे जाणारा ग्रामपंचायत नोंद असलेला रस्ता 10 मीटर रस्ता खुला करावा.
3. बौद्ध वस्तीकडे जाणारा 10 मीटर रस्ता खुला करावा.
4. संदीप दळवी यांच्या घरासमोरील रस्ता खुला करावा.
पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणाला भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांनी भेट दिली. पंचायत समिती प्रशासनाने उपोषणाची गांभीर्याने दखल घ्यावी. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावावेत, बोगस काम करणाऱ्यांवर कारवाई करावी, उपोषणातून नागरिकांच्या जीवितास धोका झाल्यास पंचायत समिती प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा भेगडे यांनी दिला. ( Citizens of Karunj village fast to death in front of Panchayat Samiti Maval office )
अधिक वाचा –
– राज्याचा अर्थसंकल्प वाचा सोप्या भाषेत, महिलांसाठी कोणत्या योजना, युवकांना काय मिळालं? राज्यावर किती कर्ज? पाहा एका क्लिकवर
– मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात ! वॅगनार कारमधील दोन जण जागीच ठार । Accident On Mumbai-Pune Expressway
– तळेगाव शहरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा ; दहावी – बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार । Talegaon Dabhade