मावळ तालुक्याची राजधानीचे ठिकाण असलेल्या वडगाव मावळ शहरातील नागरिकांची ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी गैरसोय होणार, असे दिसत आहे. जांभूळ ग्रामपंचायत हद्दीत काम सुरू असताना वडगाव शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्यामुळे संस्कृती जलशुद्धीकरण केंद्र व शिंदटेकडी जलशुद्धीकरण केंद्र येथुन होणारा पाणीपुरवठा आज, रविवारी (दि 30 जून 2024) आणि उद्या, सोमवारी (दि. 1जुलै 2024) रोजी होणार नाही, नागरिकांना पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावणारे एकनाथ शिंदे पहिले मुख्यमंत्री, फुगडी खेळली, इंद्रायणी स्वच्छतेचे दिले वचन
– वडगाव शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे टपरी आणि पथारी धारकांचे आश्वासन । Vadgaon Maval
– मोठी बातमी ! शिलाटणे गावाजवळ रात्री भीषण अपघात, सुदैवाने जिवितहानी नाही, परंतु…