मावळ तालुक्यातील कार्ला श्री एकविरा देवी पायथ्याशी असणाऱ्या दहिवली येथील शेतकरी कुंटुबात जन्मलेल्या भगवान सदाशिव मावकर यांची प्रथमता भारत सरंक्षण विभागात जनरल रिजर्व इंजिनियर फौर्स मिनिस्ट्री आॕफ डिफेन्स या सेवेत चांगल्या प्रकारे सेवा झाली. त्यांच्या या सेवेची दखल घेत भारत सरकार द्वारा आता त्यांना शेजारील देश भूतान च्या सीमेवरील सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली असून नाईक पदी दीड वर्षासाठी निवड केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भगवान मावकर यांची घरची परिस्थिती बेताची, परंतु जिद्द व चिकाटी सैन्यदलात जाण्याची आवड त्यांना थांबवू शकली नाही. तसे त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा तर माध्यमिक शिक्षण श्री एकविरा विद्यामंदिर या शाळेत घेतल्यानंतर मार्च २००३ साली पुणे जी आर इ एफ सेंटरमध्ये प्रवेश घेतला. पुढे भारतीय सैन्यदलात रुजू झाले आणि त्यांनी त्यांचे स्वप्न पुरे केले. त्यांची ही निवड झाल्याबद्दल मावळ तालुक्यातून त्यांचे विशेष अभिनंदन होत असून मावकर परिवरातील एक युवक देश सेवा करत असल्याबद्दल अभिनंदन होत आहे. ( Bhagwan Mavkar of Dahivali Maval was appointed as a Naik in the Indian army )
अधिक वाचा –
– भुशी डॅम दुर्घटना : रेस्कू ऑपरेशन पूर्ण, पाचही शव शोधण्यात आपदा मित्रांना यश, प्रतिकुल परिस्थितीत केलं शोधकार्य
– कार्ला – मळवली मार्गावरील इंद्रायणी नदीवरील पर्यायी पुल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचे दळणवळण थांबले । Karla News
– असं व्हायला नको होतं.. पर्यटनाला गालबोट लागले.. लोणावळा असं नाहीये.. चुक नेमकी कुणाची ? । Lonavala News