विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि. 1 जुलै) नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 1 लाख 43 हजार 297 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 1 लाख 32 हजार 071 मते वैध ठरली तर 11 हजार 226 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 66 हजार 036 इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे ;
1) निरंजन वसंत डावखरे, भारतीय जनता पार्टी :- 1 लाख 719
2) कीर रमेश श्रीधर, इंडियन नॅशनल काँग्रेस :- 28 हजार 585
3) विश्वजित तुळशीराम खंडारे, भीमसेना :- 536
4) अमोल अनंत पवार, अपक्ष :- 200
5) अरुण भिकण भोई (प्राचार्य),अपक्ष :- 310
6) अक्षय महेश म्हात्रे, अपक्ष :- 302
7) गोकुळ रामजी पाटील, अपक्ष :- 424
8) जयपाल परशूराम पाटील, अपक्ष :- 64
9) नागेश किसनराव निमकर,अपक्ष :- 215
10) प्रकाश वड्डेपेल्ली, अपक्ष :- 33
11) मिलिंद सिताराम पाटील, अपक्ष :- 208
12) ॲड. शैलेश अशोक वाघमारे, अपक्ष :- 334
13) श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती, अपक्ष :- 141
पहिल्या पसंतीची 1 लाख 719 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन वसंत डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले. ( Niranjan Davkhare won in Konkan Graduate Constituency Jagannath Abhyankar won in Mumbai Teachers Constituency )
मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर विजयी घोषित –
विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 12 हजार मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 11 हजार 598 मते वैध ठरली तर 402 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 5 हजार 800 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. बाराव्या फेरी अखेर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची 4 हजार 83 मते मिळवून मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.
अधिक वाचा –
– वडगाव मावळ येथील प्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव यांना राज्यस्तरीय ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’ । Vadgaon Maval
– भूतानच्या सीमेवर मावळचा सुपुत्र ! दहिवली गावचे भगवान मावकर यांची ‘नाईक’ पदी नियुक्ती । Karla News
– फौजदारी कायद्यांमधील बदलांबाबत कामशेत पोलिसांकडून जनजागृती, नेमके काय बदल झालेत? वाचा एका क्लिकवर । Kamshet News